नागपूर : आम्‍हीच जिंकणार; काँग्रेसने द्यावा ६० वर्षांचा हिशेब

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा विदर्भातील सर्व 10 जागा महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल. मी सदिच्छा भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी कोराडीत आलो. विरोधकांना बोलण्याशिवाय काहीही काम राहिलेले नाही, खरेतर 60 वर्षांचा हिशोब काँग्रेसने दिला पाहिजे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. बावनकुळे यांच्याकडे भेटीनंतर ते बोलत होते. सरकार भक्कमपणे काम करत आहे. … The post नागपूर : आम्‍हीच जिंकणार; काँग्रेसने द्यावा ६० वर्षांचा हिशेब appeared first on पुढारी.

नागपूर : आम्‍हीच जिंकणार; काँग्रेसने द्यावा ६० वर्षांचा हिशेब

नागपूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा विदर्भातील सर्व 10 जागा महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल. मी सदिच्छा भेटीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी कोराडीत आलो. विरोधकांना बोलण्याशिवाय काहीही काम राहिलेले नाही, खरेतर 60 वर्षांचा हिशोब काँग्रेसने दिला पाहिजे असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. बावनकुळे यांच्याकडे भेटीनंतर ते बोलत होते.
सरकार भक्कमपणे काम करत आहे. देवेंद्रजी आपले काम करतात, अजित दादा आपले काम करत आहेत, तर मी माझे काम करतोय, विरोधकांना बोलण्याशिवाय काही काम राहिलेले नाही असा टोला विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्या विधानावर लगावला. शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक, महिलांच्या बळावर आमचे सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीत नक्की मिळेल. लोकांनीच गॅरंटी घेतलेली आहे. विदर्भात मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजप- महायुतीचे सरकार येणार आहे. नितीन गडकरींच्या प्रचारात देखील मी काल होतो. राज्यात 45 पार आम्ही जाणार आहोत.
हॅट्रिक मोदीजी करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपूरला तर 10 एप्रिल रोजी रामटेकला सभा होत आहे. या सभेच्या दृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत. बावनकुळे माझे मित्र असून ते चांगली मेहनत घेत आहेत. सदिच्छा भेटीसाठी मी त्यांच्याकडे आलो त्यांनी हनुमानाची मूर्ती भेट दिली प्रभू रामाच्या भूमीत मोठा विजय शिवसेना मिळवणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेही वाचा :

Lok sabha election 2024 : गलती से मिस्टेक..! राहुल गांधींच्‍या सभेत भाजप उमेदवाराचा फोटो (Video) 
नागपूर : वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला, मावळ्याला सरदार कुणी केले ?

Lok Sabha Election 2024 : सांगली कुणाची याचं उत्तर मिळाल्यानंतर राऊतांचा हट्ट बदलला असेल : विशाल पाटील

Latest Marathi News नागपूर : आम्‍हीच जिंकणार; काँग्रेसने द्यावा ६० वर्षांचा हिशेब Brought to You By : Bharat Live News Media.