जुन्या स्कूटीला फिंगर स्कॅनर

नवी दिल्ली : जुगाड करावेत ते आपणच, असे म्हणावे असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोज रोज गाडीला चावी लावून गाडी स्टार्ट करण्याचा कंटाळा येतो, म्हणून एका महाभागाने चक्क जुन्या स्कूटीलाच फिंगर स्कॅनर लावला असून, येथे फिंगर स्कॅनर लावल्यानंतर ही अनोखी स्कूटी सुरू होते. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला गेला आहे. मागील काही कालावधीत फिंगर स्कॅनरचे प्रमाण बरेच वाढले आहे.
अगदी आपल्या हातातील मोबाईलपासून दरवाजाच्या लॉकपर्यंत अनेक ठिकाणी हे तंत्रज्ञान पाहायला मिळते. त्यामुळे, यात नवे असे काहीच नाही. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तरुणाने चक्क जुन्या स्कूटीमध्येही हेच तंत्र वापरून दाखवले आहे. या तरुणाने बाईकच्या लॉकजवळ एक सेन्सर बसवला आहे. त्यावर बोट ठेवताच गाडीचे इंजिन आपोआप सुरू होते. अगदी चावी फिरवण्याचीदेखील गरज नाही. आळस अगदी नसानसात भिनला असेल तरच अशी क्लृप्ती सुचते, अशी टिप्पणी काही युझर्सनी सोशल मीडियावर केली आहे.
Latest Marathi News जुन्या स्कूटीला फिंगर स्कॅनर Brought to You By : Bharat Live News Media.
