नागपूर : मुख्यमंत्री शिंदे बावनकुळे यांच्या निवासस्थानी

नागपूर : Bharat Live News Media वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (रविवार) रात्री शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना मेळाव्यात मार्गदर्शन केले. यानंतर आज (सोमवार) सकाळी ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. रविवारी रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी झाल्यानंतर आज रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रचार दौऱ्यासाठी ते सहभागी होणार आहेत.
आज चंद्रपूर येथे तर 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. या दृष्टीने पूर्व नियोजनासाठी ही बैठक असल्याची माहिती आहे. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार आशिष देशमुख, भाजप सेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :
‘खडसेंबाबतचा निर्णय केंद्रीय समिती घेईल’ : चंद्रशेखर बावनकुळे
Lok sabha election 2024 : प्रियंका गांधी लोकसभेत पदार्पण करणार? ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार?
चक्क ‘राजा’चीही फसवणूक; देवगड, रत्नागिरीच्या बॉक्समध्ये कर्नाटक हापूस
Latest Marathi News नागपूर : मुख्यमंत्री शिंदे बावनकुळे यांच्या निवासस्थानी Brought to You By : Bharat Live News Media.
