
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल २०२४ (IPL 2024) चा २० वा सामना रविवारी (दि.७) मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात खेळला गेला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील एमआयने डीसीचा २९ धावांनी पराभव केला. हार्दिक ब्रिगेडने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ५ बाद २३४ असे मोठे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीची मजल २० षटकांत ८ बाद २०५ धावांपर्यंतच गेली. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) यंदाच्या हंगामातील हा पहिला विजय आहे. मुंबईने केवळ विजयाची गुढी उभारली नाही तर विश्वविक्रमही आपल्या नावावर केला. (Mumbai Indians)
संबंधित बातम्या :
आणखी एक ‘विराट’ किर्तीमान….. कोहली@7500
हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार?
आयपीएलमधून 2 वर्षे बाहेर राहिला, पण पुनरागमन करताच खळबळ उडवून दिली
IPL 2024 : इशांतच्या ‘यॉर्कर’समोर रसेलचे लोटांगण! ( पाहा व्हिडिओ )
टी-२० (T20) क्रिकेटमध्ये १५० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पहिला संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स नंतर यादीत चेन्नई सुपर किंग्स (CSK) आहे. सीएसकेने आतापर्यंत १४८ सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहेत. एमआय आणि सीएसकेने प्रत्येकी पाच ट्रॉफी जिंकल्या आहेत. सीएसके (CSK) हा गतविजेता आहे. एमआयने आणखी एक विक्रम केला. आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी ५० सामने जिंकणारा मुंबई पहिला संघ बनला आहे. (Mumbai Indians)
Mumbai Indians : आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी सर्वाधिक विजय
५० – वानखेडे येथे एमआय
४८ – ईडन गार्डन्सवर केकेआर
४७ – चेन्नईमध्ये सीएसके
४१ – बेंगळूरमध्ये आरसीबी
३६ – जयपूरमध्ये आर.आर
Mumbai Indians : रोमरिओ शेफर्ड मुंबईच्या विजयाचा हीरो
रोहित शर्मा (४९), इशान किशन (४२), हार्दिक पंड्या (३९), टीम डेव्हिड (४५) आणि रोमॅरियो शेफर्ड (नाबाद ३९) यांनी एमआयला (Mumbai Indians) मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १० चेंडूत ३९ धावा आणि एक विकेट घेणारा रोमरिओ शेफर्ड मुंबईच्या विजयाचा हीरो ठरला. रोहितनेही फडकेबाजी केली; परंतु त्याचे अर्धशतक एका धावेने हुकले. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्सने (नाबाद ७१) सर्वाधिक धावा केल्या. पृथ्वी शॉने ६६ आणि अभिषेक पोरेलने ४१ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा :
‘हिटमॅन’च्या नावावर आणखी एक विक्रम; बनला अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
मुंबईचा पहिला विजय; दिल्ली 29 धावांनी पराभूत
IPL फॅन पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर! कोल्हापूरसह ‘या’ शहरांचा समावेश
CSKला मोठा धक्का! ‘हा’ यशस्वी गोलंदाज मायदेशी परतला
Latest Marathi News मुंबई इंडियन्सने रचला इतिहास, टी-२० मध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला संघ Brought to You By : Bharat Live News Media.
