चक्क ‘राजा’चीही फसवणूक; देवगड, रत्नागिरीच्या बॉक्समध्ये कर्नाटक हापूस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होताच गुलटेकडी मार्केट यार्डात रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री सुरू झाली आहे. फळबाजारातील काही अडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात असताना बाजारात होत असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फळांचा राजा म्हणून देशासह … The post चक्क ‘राजा’चीही फसवणूक; देवगड, रत्नागिरीच्या बॉक्समध्ये कर्नाटक हापूस appeared first on पुढारी.

चक्क ‘राजा’चीही फसवणूक; देवगड, रत्नागिरीच्या बॉक्समध्ये कर्नाटक हापूस

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्यांचा हंगाम सुरू होताच गुलटेकडी मार्केट यार्डात रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्यांची विक्री सुरू झाली आहे. फळबाजारातील काही अडत्यांकडून रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक केली जात असताना बाजारात होत असलेल्या या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. फळांचा राजा म्हणून देशासह परदेशात रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याने नावलौकिक मिळविला आहे. नावलौकिकाबरोबर रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याला जीआय (भौगोलिक उपदर्शन) हे गुणवत्तेचे मानांकन मिळाले आहे.
मार्केट यार्डमध्ये आंब्यांचा हंगाम बहरला असून, कोकणातील हापूससह परराज्यांतील विविध जातींच्या आंब्यांची आवक वाढली आहे. मात्र, अनेक आडते ग्राहकांची फसवणूक करीत परराज्यांतील आंब्यांची रत्नागिरी, देवगड हापूस आंब्यांच्या नावाने विक्री करीत आहेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी तत्कालीन पणन संचालकांनी परिपत्रक काढत अशा फसवणूक करणार्‍या आडत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश राज्यातील सर्व बाजार समित्यांना देऊन सुमारे चार वर्षे होत आली. मात्र, मार्केट यार्डमध्ये राजरोसपणे कर्नाटक, केरळ,  आंध्र प्रदेशातील आंब्यांची देवगड, रत्नागिरी हापूसच्या बॉक्समध्ये भरून विक्री केली जात आहे.
…अन्यथा मार्केट यार्डातील उलाढालीवर परिणाम
मार्केट यार्डात आंब्यांच्या हंगामात प्रत्यक्ष झालेली आवक आणि कागदावर आवक यात मोठी तफावत असते. ग्राहकांची फसवणूक करणारे बहुतांश आडतदार हे परराज्यांतील आंबा विक्री करतात. मात्र, प्रशासनाच्या साटेलोट्यामुळे कारवाई केली जात नाही. परिणामी नागरिकांची फसवणूक होते. या प्रकारामुळे भविष्यात मार्केट यार्डात नागरिक आंबा खरेदी करण्यासह आवकेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हापूसच्या नावाखाली इतर आंबा विक्री करून फसवणूक करणार्‍या आडत्यांवर पहिल्या टप्प्यात दंडात्मक आणि परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल. पुढील काळात नियमानुसार कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

हेही वाचा

चौरंगी लढतींमुळे पंजाबात रंगत वाढली
चर्चा जपानच्या चांद्रमोहिमेची!
राज्यात 108 लाख टन साखर उत्पादन तयार..

Latest Marathi News चक्क ‘राजा’चीही फसवणूक; देवगड, रत्नागिरीच्या बॉक्समध्ये कर्नाटक हापूस Brought to You By : Bharat Live News Media.