रबरासारखा काळा मासा

वॉशिंग्टन : जगभरात असे अनेक जीव आहेत, जे पाहिल्यानंतर क्षणभर त्यावर विश्वासही बसणार नाही. ते खूप वेगळ्या प्रकारचे जीव असल्याचे दिसून येतील. तसेच काही वेळा अगदी जिवंतही वाटणार नाहीत; पण तरीही ते हैराण करून जातात. सध्या अशाच एका माशाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, प्रथमदर्शनी हा मासा नव्हे, तर रबरी चेंडू असल्याचाच भास होईल; पण वस्तुस्थिती … The post रबरासारखा काळा मासा appeared first on पुढारी.

रबरासारखा काळा मासा

वॉशिंग्टन : जगभरात असे अनेक जीव आहेत, जे पाहिल्यानंतर क्षणभर त्यावर विश्वासही बसणार नाही. ते खूप वेगळ्या प्रकारचे जीव असल्याचे दिसून येतील. तसेच काही वेळा अगदी जिवंतही वाटणार नाहीत; पण तरीही ते हैराण करून जातात. सध्या अशाच एका माशाचा व्हिडीओ व्हायरल होत असून, प्रथमदर्शनी हा मासा नव्हे, तर रबरी चेंडू असल्याचाच भास होईल; पण वस्तुस्थिती अगदीच वेगळी असून, हा चक्क गोल्ड फिश मासा आहे आणि तरीही काळा आहे.
अ‍ॅमेझिंग नेचर या ट्विटर अकाऊंटवरून अनेक हैराण करणारे व्हिडीओ पोस्ट केले जातात. अलीकडेच एक व्हिडीओ पोस्ट केला गेला असून, त्यात हा काळा मासा दिसून आला. काळ्या रंगाचा गोल्ड फिश आजवर क्वचितच आढळून आला आहे. एका व्यक्तीने हा मासा आपल्या तळहातावर घेतल्यानंतर त्या माशाचा चेहरा दिसून आला; पण तरीही माशाचे डोळे स्पष्टपणे दिसून येत नव्हते.
या माशाला ब्लॅक ऑरेंडो या नावानेही ओळखले जाते. ओरेंडो एक प्रकारचे गोल्ड फिश असते आणि हा मासा अगदी अ‍ॅक्वेरियममध्येही दिसून येतो. आता गोल्ड फिशच्या जातीतील असूनही त्याचा रंग काळा कसा, हा प्रश्न उपस्थित होईल. विकिपीडियानुसार, या प्रजातीची पैदास करण्यासाठी गोल्ड फिश व ब्लॅक मोर माशांना एकत्र आणले जाते. त्यामुळे त्यांना काळा रंग प्राप्त होतो.
व्हायरल व्हिडीओत या माशाच्या चेहर्‍यावर रबरासारखे छोटे-छोटे चेंडूचे आकार दिसून येतात. त्यात त्याचा फक्त चेहरा दिसून येत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 55 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
Latest Marathi News रबरासारखा काळा मासा Brought to You By : Bharat Live News Media.