दक्षिण, पूर्व भारतात भाजपाला मोठा विजय मिळेल ; प्रशांत किशोर यांचा दावा

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला. दक्षिण, पूर्व भारतात भाजपाला मोठा विजय मिळेल आणि भाजप ३०० वर जागा जिंकेल, असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. भाजपच्या दाव्याप्रमाणे ३७० जागा मात्र जिंकता येणार नाहीत, असे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. (Lok Sabha Election 2024)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत यांनी सांगितले की, विरोधकांची एकूणच रणनीती कमकुवत आहे. भाजपला या निवडणुकीत दक्षिण भारतात तसेच पूर्व भारतात २०१९ च्या तुलनेत अधिक जागा व मतेही मिळतील. ओडिशा आणि बंगालमध्ये भाजप नंबर १ चा पक्ष असेल, असा दावाही त्यांनी केला. तेलंगणात भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहील. तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी दुहेरी आकडा गाठेल, असे अंदाजही प्रशांत किशोर यांनी वर्तविले. (Lok Sabha Election 2024)
लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळमध्ये मिळून २०४ जागा आहेत. काँग्रेससाठी लढाईचे खरे मैदान उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे. मात्र या पक्षाचे नेते मणिपूर आणि मेघालयकडे बघतात. तेथे जातात. वरील तीन राज्यांत जिंकले नाही तर वायनाडमध्ये जिंकून काही उपयोग नाही. राहुल गांधींनी अमेठीतून लढायला हवे होते. एकटे केरळ जिंकून देश जिंकता येणार नाही, असेही प्रशांत किशोर म्हणाले. (Lok Sabha Election 2024)
हे ही वाचा:
Lok Sabha Elections 2024 | काँग्रेसची उत्तर गोव्यातून रमाकांत खलप यांना उमेदवारी, दक्षिण गोव्यात फ्रान्सिस्को सार्दिन यांना वगळले
Nashik Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स, प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॉटल देणार
Lok Sabha Elections 2024 : महायुतीचे जागावाटपही ठरेना; एकनाथ शिंदे, फडणवीस दौर्याने चर्चा लांबणीवर
Latest Marathi News दक्षिण, पूर्व भारतात भाजपाला मोठा विजय मिळेल ; प्रशांत किशोर यांचा दावा Brought to You By : Bharat Live News Media.
