सुप्रिया सुळेंना धक्का ! खंदे समर्थक प्रवीण माने अजित पवार गटात

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली. शुक्रवारी (दि. 5) इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित … The post सुप्रिया सुळेंना धक्का ! खंदे समर्थक प्रवीण माने अजित पवार गटात appeared first on पुढारी.

सुप्रिया सुळेंना धक्का ! खंदे समर्थक प्रवीण माने अजित पवार गटात

इंदापूर : Bharat Live News Media वृत्तसेवा : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय धुमश्चक्री सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी, इंदापूरच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने यांनी दिली. शुक्रवारी (दि. 5) इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित केलेल्या भाजपाचा कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान हेलिपॅडवर प्रवीण माने हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला गेले होते.
तसेच माने यांच्या निवासस्थानी फडणवीस गेल्याने तालुक्यात माने यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. अखेर रविवारी (दि. 7) इंदापूर येथील माने परिवाराच्या सोनाई निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदमध्ये प्रवीण माने यांनी सुनेत्रा पवार यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, बाळासाहेब ढवळे, राजेश जामदार, शिवाजी तरंगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा

उमेदवारांना पाडणारे बना : मनोज जरांगे
Loksabha election | ‘इंडिया’ उमेदवारांचा ‘आप’ करणार प्रचार; अजित फाटके
Loksabha election | मग भुजबळांना बघतो..; मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले

Latest Marathi News सुप्रिया सुळेंना धक्का ! खंदे समर्थक प्रवीण माने अजित पवार गटात Brought to You By : Bharat Live News Media.