Loksabha election | मग भुजबळांना बघतो..; मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले

देहूगाव : नाशिकमधून लोकसभा मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. परंतु, नाशिकमधून त्यांनी आधी उभे तर राहू द्या मग बघतो, असे वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील रविवारी पुणे दौर्यावर आले होते. पिंपरी-चिंचवडचा दौरा करून ते श्रीक्षेत्र देहूगाव येथे आले.
या वेळी त्यांचे देहूनगरीत स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्याबाबत हे विधान केले. मुख्य मंदिरात जाऊन श्री संत तुकोबारायांचे त्यांनी दर्शन घेतले. या वेळी श्री संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थांच्या वतीने मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला. संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे, विश्वस्त माणिकमहाराज मोरे, विशालमहाराज मोरे, संजयमहाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे आणि अन्य विश्वस्त उपस्थित होते.
हेही वाचा
विजयाचे शिलेदार व्हा : पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर : सामना पाहून येताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू
पुणे : शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या तरुणीचा खंडणीसाठी अपहरण करुन खून
Latest Marathi News Loksabha election | मग भुजबळांना बघतो..; मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले Brought to You By : Bharat Live News Media.
