Weather Update : राज्यात अवकाळीचा अंदाज, तर ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रविवारी सोलापूरचा पारा सलग दुसर्‍या दिवशी राज्यात सर्वाधिक 42.3 अंशांवर गेला होता. दरम्यान 11 एप्रिलपर्यंत सर्वत्र अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोलापूरचा पारा शनिवारी 43 अंशांवर गेला होता. रविवारीदेखील सोलापूरचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदवले गेले. राज्यात रविवारी बहुतांश भागात सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी पुन्हा कडक ऊन … The post Weather Update : राज्यात अवकाळीचा अंदाज, तर ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण appeared first on पुढारी.
Weather Update : राज्यात अवकाळीचा अंदाज, तर ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : रविवारी सोलापूरचा पारा सलग दुसर्‍या दिवशी राज्यात सर्वाधिक 42.3 अंशांवर गेला होता. दरम्यान 11 एप्रिलपर्यंत सर्वत्र अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोलापूरचा पारा शनिवारी 43 अंशांवर गेला होता. रविवारीदेखील सोलापूरचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदवले गेले. राज्यात रविवारी बहुतांश भागात सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र, दुपारी पुन्हा कडक ऊन पडले. त्यामुळे राज्यात कुठेही मोठ्या पावसाची नोंद झाली नाही. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झालेला आहे. त्यामुळे 8 ते 11 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवारचे कमाल तापमान..
सोलापूर 42.3, पुणे 39.6, कोल्हापूर 39.6, मुंबई 33.3, अहमदनगर 39.8, महाबळेश्वर 34.3, मालेगाव 39, नाशिक 36.9, सातारा 39.7, छत्रपती संभाजीनगर 39.5, परभणी 41, नांदेड 40.2, बीड 39.9, अकोला 41.5, नागपूर 40.6, वर्धा 41, यवतमाळ 42.
हेही वाचा

Lok Sabha Elections : काश्मीरमध्ये आम्ही संविधान नेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोल्हापूर : सामना पाहून येताना हृदयविकाराने तरुणाचा मृत्यू
कच्छथिवू वाद आणि भारताचे परराष्ट्र धोरण

 
Latest Marathi News Weather Update : राज्यात अवकाळीचा अंदाज, तर ‘हा’ भाग असेल अधिक उष्ण Brought to You By : Bharat Live News Media.