काश्मीरमध्ये आम्ही संविधान नेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवादा (बिहार);  वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नव्हते, तिथे वेगळेच कायदे होते. काश्मीरचे 370 कलम रद्द करून बाबासाहेबांचे संविधान आम्ही तेथेही नेले. तेथेही एससी/एसटी, ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळवून दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Lok Sabha Elections) ते पुढे म्हणाले, तुमच्या (काँग्रेस-संपुआ) काळात भारतात सतत दहशतवादी हल्ले घडविणारे, भारताला सतत दम देणारे … The post काश्मीरमध्ये आम्ही संविधान नेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on पुढारी.

काश्मीरमध्ये आम्ही संविधान नेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवादा (बिहार);  वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नव्हते, तिथे वेगळेच कायदे होते. काश्मीरचे 370 कलम रद्द करून बाबासाहेबांचे संविधान आम्ही तेथेही नेले. तेथेही एससी/एसटी, ओबीसी प्रवर्गाला आरक्षण मिळवून दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (Lok Sabha Elections)
ते पुढे म्हणाले, तुमच्या (काँग्रेस-संपुआ) काळात भारतात सतत दहशतवादी हल्ले घडविणारे, भारताला सतत दम देणारे आमच्या काळात पिठालाही ‘मोहताज’ झालेले आहेत, आणि इंडी आघाडी म्हणते, मोदींनी काय केले? मोदींच्या गॅरंटीजना गुन्हा म्हणण्यापर्यंत आता इंडीची मजल गेली आहे. काश्मीरबाबतचे कलम 370 आणि तीन तलाक रद्द करण्याची गॅरंटी मीच दिली होती. मग मी ती पूर्ण केली की नाही? मी जे बोलतो ते करतोच, असा दावाही पंतप्रधानांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. (Lok Sabha Elections)
पंतप्रधानांनी इंडिया आघाडी, राम मंदिर, तुकडे तुकडे गँग, जंगल राजसारख्या अनेक विषयांवर भाष्य केले. उद्योगाचा हब व्हायचे तर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. गत दहा वर्षांत आम्ही देशात पायाभूत सुविधांचे जाळे घट्ट विणले आहे. डोंगरांतून रस्ते काढले. नद्यांखालून रस्ते काढले. सांगता येणार नाही इतके हे प्रचंड काम आहे. येणार्‍या कार्यकाळात पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताच्या समावेशाची गॅरंटी देतो आहे. विकसित भारताची गॅरंटी देतो आहे. रोजगाराच्या लाखो संधींची गॅरंटी देतो आहे. काल मी ज्या गॅरंटी दिल्या होत्या, त्या आज तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसत आहेत. तितक्याच स्वाभाविकपणे आज मी तुम्हाला ज्या गॅरंटी देत आहे, त्या उद्या पूर्ण झालेल्या असतील, असा दावा पंतप्रधानांनी केला.
नितीश कुमार म्हणाले, भाजप 4 हजार जागा जिंकेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दणदणीत भाषण करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चक्क भाजप लोकसभेत 4 हजार जागा जिंकेल, असे विधान केल्याने एकच हशा उसळला. पंतप्रधानांनीही या विधानावर त्यांची फिरकी घेतली. तुम्ही इतके जोरदार आणि चांगले भाषण केले की, मला बोलायलाच काही ठेवले नाही. यावर हसत हसत नितीश कुमार यांनी खाली वाकून मोदी यांचे पायच पकडले, असे मोदी म्हणाले. (Lok Sabha Elections)
The post काश्मीरमध्ये आम्ही संविधान नेले : पंतप्रधान नरेंद्र मोदी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source