Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामात दिल्लीविरूद्ध खेळताना मुंबईतच्या रोहितने फलंदाजी करताना टी-20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर मुंबई इंडियन्ससाठी इशान किशनसोबत डावाची सलामी देण्यासाठी आलेला रोहित शर्मा आक्रमक शैलीत फलंदाजी करत होता. आपल्या खेळीत तो 27 चेंडूत 49 धावांची खेळी करून बाद झाला. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. यासह रोहितने T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी केली जी यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आली नव्हती. (Rohit Sharma Record)
टी-20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक चौकार लगावणारा खेळाडू
रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एकूण 9 चौकार लगावले. यासह त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 1508 चौकार लगावले आहेत. यासह रोहित टी-20 फॉरमॅटमध्ये 1500 हून अधिक चौकार मारण्याचा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितनंतर, विराट कोहली टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक चौकार ठोकणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, विराटने टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 1486 चौकार आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम पाहिल्यास ख्रिस गेल पहिल्या स्थानावर आहे, त्याने आतापर्यंत एकूण 2196 चौकार लगावले आहेत. (Rohit Sharma Record)
T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू
ख्रिस गेल – 2196
ॲलेक्स हेल्स – 1855
डेव्हिड वॉर्नर – 1673
किरॉन पोलार्ड – 1670
आरोन फिंच – 1557
रोहित शर्मा – 1508
मुंबई इंडियन्सची दमदार सुरूवात
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात त्याने संघाला वेगवान सुरुवात करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रोहितने इशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली.
𝙍𝙤 made the बच्चा पार्टी at Wankhede happy today with his 🔥 start 💙
49 (27) 💪💥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC #ESADay #EducationAndSportsForAll | @ImRo45 pic.twitter.com/1BH6yAfZmG
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2024
हेही वाचा :
Eknath Khadse join BJP : …म्हणून भाजपमध्ये पुन्हा घरवापसी; एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा
काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत २४४ उमेदवार जाहीर
छत्रपती संभाजीनगर : उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार
Latest Marathi News ‘हिटमॅन’च्या नावावर आणखी एक विक्रम; बनला अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय Brought to You By : Bharat Live News Media.