उत्तर प्रदेशमध्ये आज ‘No non-veg day’; जाणून घ्या कारण?
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये आज (दि. २५) स्वातंत्र्यसैनिक टीएल वासवानी यांची जयंती ‘नो नॉन-व्हेज डे’ (No non-veg day) म्हणून साजरी केली जात आहे. हलाल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीएल वासवानी यांचा जन्मदिवस ‘नो नॉन व्हेज डे’ म्हणून घोषित केला होता. आज उत्तर प्रदेशमधील सर्व मटन, चिकन दुकाने आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. वासवानी यांनी आपले संपूर्ण आयुष्य निसर्गाच्या रक्षणासाठी समर्पित केले होते. (UP No non-veg day)
या संदर्भात विशेष सचिव धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी उत्तर प्रदेशातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे. वासवानी यांची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्यासाठी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांसाची दुकाने जयंतीदिनी बंद ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मांसाची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.
थनवरदास लीलाराम वासवानी यांचा जन्म २५ नोव्हेंबर १८७९ रोजी हैदराबाद, सिंध येथे झाला. आता ही जागा पाकिस्तानात आहे. वासवानी यांनी १८९९ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवी आणि १९०२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले. प्राण्यांची हत्या थांबवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. झाडे आणि वनस्पतींनाही जीवन असते, असा त्यांचा विश्वास होता. भारतीय संस्कृती आणि धार्मिक सहिष्णुतेचे ते अद्वितीय उपासक होते. वासवानी हे शिक्षणतज्ञही होते. त्यांनी मीरा मूव्हमेंट इन एज्युकेशन ही संस्था सुरू केली. त्यांनी हैदराबाद, सिंध (आता पाकिस्तानमध्ये) येथे सेंट मीरा स्कूलची स्थापना केली होती.
Uttar Pradesh | 25th November 2023 declared as ‘No non-veg day’ on the occasion of the birth anniversary of Sadhu TL Vaswani. All slaughterhouses and meat shops to remain closed on the day. pic.twitter.com/wZHPUHVGuJ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) November 24, 2023
हेही वाचा :
सावधान! पुढील ३ तासांसाठी ‘या’ दोन राज्यांना वादळाचा इशारा
शिवकुमारांना दिलासा; विरोधक हताश
निवडणुकीच्या ताेंडावर तेलंगणात 5 कोटींची रोकड जप्त; 7 जण ताब्यात
चीनी एव्हिएन इन्फ्लुएन्झावर भारत सरकारचे बारकाईने लक्ष
Rajasthan Election : 94 वर्षीय कार्यकर्त्याला पाहिले, अन् मोदींच्या भाषणाचा नूरच पालटला
israel hamas war: इस्रायल-हमासमध्ये चार दिवसांची युद्धबंदी : १३ इस्रायली महिला, लहान मुलांची सुटका होणार
The post उत्तर प्रदेशमध्ये आज ‘No non-veg day’; जाणून घ्या कारण? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशमध्ये आज (दि. २५) स्वातंत्र्यसैनिक टीएल वासवानी यांची जयंती ‘नो नॉन-व्हेज डे’ (No non-veg day) म्हणून साजरी केली जात आहे. हलाल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टीएल वासवानी यांचा जन्मदिवस ‘नो नॉन व्हेज डे’ म्हणून घोषित केला होता. आज उत्तर प्रदेशमधील सर्व मटन, चिकन दुकाने आणि कत्तलखाने …
The post उत्तर प्रदेशमध्ये आज ‘No non-veg day’; जाणून घ्या कारण? appeared first on पुढारी.