दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनंगटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 एप्रिल 2024 ला चंद्रपूरात येत आहेत. ते जाहीर सभेला संबोधित करतील. दहा वर्षापूर्वी 2014 मध्ये ते हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी आले होते. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राकरीता सुधीर मुनगंटीवार भाजपाचे उमेदवार उभे आहेत. ते पहिल्यांदाच … The post दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात appeared first on पुढारी.

दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात

चंद्रपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनंगटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 8 एप्रिल 2024 ला चंद्रपूरात येत आहेत. ते जाहीर सभेला संबोधित करतील. दहा वर्षापूर्वी 2014 मध्ये ते हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी आले होते.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राकरीता सुधीर मुनगंटीवार भाजपाचे उमेदवार उभे आहेत. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे उद्या दिनांक 8 एप्रिल 2024 ला मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात येत आहेत. जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असून ते सभेप्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधीत करतील. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात भाजपाचे सुधीर मुनगंटीवार तर दिव्यंगत खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर ह्या काँग्रेसकडून उमेदवार आहेत. सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राज्यातून बाळू उर्फ सुरेश धानोरकर हे चंद्रपूर लोकसभा वणी आर्णी क्षेत्रातून प्रचंड मत्ताधिक्यांनी विजयी झाले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार हंसराज अहीर यांना पराभव पत्करावा लागला आणि भाजपाच्या हातातील सिट काँग्रेसच्याय ताब्यात गेली. तीच सिट आता परत मिळविण्यासाठी भाजपाने सर्व ताकद लावली आहे. सन 2014 मोदी हे हंसराज अहीर यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरात आले होते. त्यानंतर पुन्हा 10 वर्षांनी मुनगंटीवार यांच्या प्रचार सभेकरीता उद्या येत आहेत. यावेळी चंद्रपूर लोकसभेची सिट भाजपासाठी प्रतिष्ठेची मानल्या जात आहे. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेची सिट जिंकण्यासाठी भाजपाची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामुळे 2014 मध्ये मोदींची जादू चालल्याने हंसराज अहीर विजयी झाले होते. यावेळी पुन्हा त्यांची जादू चालून मुनगंटीवार विजयी होतील का? ते पहावे लागणार आहे.
Latest Marathi News दहा वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूरात Brought to You By : Bharat Live News Media.