पिंपरी : नवीन तालेरा रूग्णालय कधी सुरु होणार ?

पिंपरी : नवीन तालेरा रूग्णालय कधी सुरु होणार ?

दीपेश सुराणा

पिंपरी : चिंचवडगाव येथील नवीन तालेरा रुग्णालयाची इमारत बांधून तयार झाली आहे. मात्र, अद्याप येथील रुग्णालय सुरू झालेले नाही. येथे नव्याने 1 कोटी 95 लाख 96 हजार रुपयांची स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे. त्या कामासाठी 9 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे आता हे रुग्णालय आणखी किती दिवस रखडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने तालेरा रुग्णालयाची जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभारली आहे. या रुग्णालय इमारतीसाठी 1 मार्च 2018 रोजी कामाचे आदेश देण्यात आले.
58 हजार 476 चौरस फूटात हे बांधकाम करण्यात येत आहे. इमारतीचे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या इमारतीत ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत. तर, नवीन रुग्णालय इमारतीत मल्टिस्पेशालिटी सुविधा देण्याचे नियोजन आहे.
नवीन तालेरा रुग्णालयाची इमारत पाचमजली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, रंगरंगोटी देखील केली आहे. या इमारतीत सध्या फर्निचर आणि विद्युतविषयक विविध कामे बाकी आहेत. त्याचप्रमाणे, रुग्णालयासाठी आवश्यक वैद्यकीय सामग्रीची व्यवस्था करावी लागणार आहे.
रुग्णालयात कोणत्या सुविधा मिळणार ?
बाह्य रुग्ण विभाग, 12 तपासणी कक्ष, क्ष-किरण तपासणी, प्रशस्ती प्रतीक्षागृह व स्वच्छतागृह, उपहारगृह, 24 तास फार्मसीची सोय, आपत्कालीन ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स, आपत्कालीन अतिदक्षता विभाग, पॅथालॉजी लॅब, फिजिओथेरपी, सिटी स्कॅन, डे-केअर वॉर्ड (7 खाटा), अद्ययावत ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स – 4, डायलेसिस विभाग, पुरुष व महिलांचा मेडिकल वॉर्ड (36 खाटा), सर्जिकल विभाग (36 खाटा), प्रशासन विभाग, निवासी वैद्यकीय अधिकारी कक्ष, कान-नाक-घसा व नेत्र विभाग (16 खाटा), अस्थिरोग विभाग (20 खाटा), सभागृह (आसन व्यवस्था – 100), पार्किंग प्रस्तावित 67 चारचाकी आणि 85 दुचाकी वाहनांसाठी सोय.
महापालिकेच्या नवीन तालेरा रुग्णालयात सध्या फर्निचर आणि विद्युतविषयक कामे बाकी आहेत. तसेच, स्थापत्यविषयक पार्टीशन व अन्य कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केली आहे. त्याबाबत कामाचे आदेश दिल्यानंतर पुढील 4 महिन्यांत गतीने ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
                                                 – मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका.
The post पिंपरी : नवीन तालेरा रूग्णालय कधी सुरु होणार ? appeared first on पुढारी.

पिंपरी : चिंचवडगाव येथील नवीन तालेरा रुग्णालयाची इमारत बांधून तयार झाली आहे. मात्र, अद्याप येथील रुग्णालय सुरू झालेले नाही. येथे नव्याने 1 कोटी 95 लाख 96 हजार रुपयांची स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहे. त्या कामासाठी 9 महिन्यांची मुदत निश्चित केली आहे. त्यामुळे आता हे रुग्णालय आणखी किती दिवस रखडणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने …

The post पिंपरी : नवीन तालेरा रूग्णालय कधी सुरु होणार ? appeared first on पुढारी.

Go to Source