अमेठीतही लढणार राहुल गांधी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील महत्त्वाच्या मतदारसंघांत गणल्या जात असलेल्या अमेठी व रायबरेलीतून काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेठीतून राहुल गांधीच उमेदवार राहतील व फक्त रायबरेलीत उमेदवार बदलला जाईल. काँग्रेसने राहुल यांच्या अमेठीतील उमेदवारीचे संकेत दिले आहेत. मात्र याची घोषणा नंतर केली जाणार आहे. सूत्रांनी … The post अमेठीतही लढणार राहुल गांधी appeared first on पुढारी.

अमेठीतही लढणार राहुल गांधी

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : देशातील महत्त्वाच्या मतदारसंघांत गणल्या जात असलेल्या अमेठी व रायबरेलीतून काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, अमेठीतून राहुल गांधीच उमेदवार राहतील व फक्त रायबरेलीत उमेदवार बदलला जाईल.
काँग्रेसने राहुल यांच्या अमेठीतील उमेदवारीचे संकेत दिले आहेत. मात्र याची घोषणा नंतर केली जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसर्‍या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर या जागांवरील उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. दुसरीकडे दुसर्‍या टप्प्यातच केरळच्या वायनाड मतदारसंघात मतदान होणार असून तेथे राहुल गांधी काँग्रेसचे उमेदवार आहेत. रायबरेली हा सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे. त्या आता राज्यसभेवर निवडून गेल्याने तेथून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. तेथून प्रियांका गांधी उमेदवार राहतील अशी शक्यता आहे.
उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपा यांच्यात युती झाली असून तेथे 80 पैकी 17 जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यातील 14 ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले असून अमेठी, रायबरेली आणि प्रयागराज या तीन जागांचे उमेदवार जाहीर होणे बाकी आहे.
Latest Marathi News अमेठीतही लढणार राहुल गांधी Brought to You By : Bharat Live News Media.