नागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत U.O.T.C कॅम्पमध्ये कर्तव्यावर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगेश मस्के( ब. न.1248 ) असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहितीनुसार, शनिवार (६ एप्रिल) क्वार्टर गार्ड म्हणून डुटीवर असताना एका खोलीत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवपले. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. मनमिळाऊ स्वभावाच्या मंगेश मस्के यांनी टोकाचे पाऊल का उचलेले यासंदर्भात गूढ कायम असून पोलीस तपासात गुंतले आहेत.
यापूर्वी पुण्यातील लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना ताजी असतानाच आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याचे प्रकरण समोर आले आहे. यातून सततच्या ड्युटीतून पोलिसांवर ताण वाढतोय की अन्य कौटुंबिक कारणे यामागे आहेत त्याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.
Latest Marathi News नागपूर : वाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून संपवले जीवन Brought to You By : Bharat Live News Media.
