बीड: आमदार प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात मारहाण

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : पाच महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड, जाळपोळ प्रकरणात विनाकारण नाव गोवल्याच्या रागातून आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना भररस्त्यात फरफटत ओढत मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रंगोली कॉर्नरजवळ घडली. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय राऊत यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यामावर व्हायरल होत … The post बीड: आमदार प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात मारहाण appeared first on पुढारी.

बीड: आमदार प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात मारहाण

माजलगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : पाच महिन्यांपूर्वी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची तोडफोड, जाळपोळ प्रकरणात विनाकारण नाव गोवल्याच्या रागातून आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना भररस्त्यात फरफटत ओढत मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रंगोली कॉर्नरजवळ घडली. भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांचे पुतणे अजय राऊत यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यामावर व्हायरल होत आहे. Prakash Solanke
पाच महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केलेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रकाश सोळंके यांच्या कार्यालयासह बंगल्याची तोडफोड करून आग लावण्यात आली होती. या प्रकरणात शेकडो आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून अनेकांना अटक केली होती. याच प्रकरणात आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांनी विनाकारण नाव गोवल्याचा राग अजय राऊत यांना होता.
शुक्रवारी सायंकाळी रंगोली कॉर्नरजवळ महादू सोळंके आले असता अजय राऊत यांनी नाव का गोवले याची विचारपूस करत मारहाण केली. सोळंके यांना भररस्त्यावरून फरफटत नेत लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली. याबाबत दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नव्हता. Prakash Solanke
हेही वाचा 

बीड : मराठा आरक्षणासाठी माटेगावातील तरूणाने जीवनयात्रा संपविली
काँग्रेसचा विरोध झुगारून भिवंडीत शरद पवार गटाचा उमेदवार; सुरेश म्हात्रेंना तिकीट; बीडमधून बजरंग साेनावणे
बीड: ताडसौन्ना येथे पाण्याअभावी २ एकरातील मोसंबीची बाग उपटली

Latest Marathi News बीड: आमदार प्रकाश सोळंकेंच्या स्वीय सहायकाला भर रस्त्यात मारहाण Brought to You By : Bharat Live News Media.