अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मराठी भाषेतून घेतली शपथ
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनी संसद भवनात शपथ दिली.
अशोक चव्हाण म्हणाले, आपण महाराष्ट्राचे आहोत. मराठी लोकांकडून मला प्रेम मिळालं. म्हणूनच मी मराठीतून शपथ घेतली. मी विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभेत काम केेलं. चारही सभागृहात काम करण्याची संधी मिळाली. आज योगायोग म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत शपथ घेण्याची संधी मिळाली. जे जे लोक येतील ते भाजप साठी उपयुक्त ठरतील. त्यांचे स्वागत आहे, असेही त्यांनी नमूद केले. युद्धात आत्मविश्वास असावा लागतो, त्यानुसार जावं लागेल. जनतेचा कौल महत्त्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
Rajya Sabha Chairman #JagdeepDhankhar administers oath/affirmation to the newly-elected member Ashokrao Chavan in the Parliament House.@VPIndia @harivansh1956 pic.twitter.com/435SMNcNAV
— SansadTV (@sansad_tv) April 6, 2024
Latest Marathi News अशोक चव्हाण यांनी राज्यसभा सदस्य म्हणून मराठी भाषेतून घेतली शपथ Brought to You By : Bharat Live News Media.