सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री, आप नेते मनिष सिसोदिया हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर आज (दि.६) सुनावणी पार पडली. यावेळी दिल्ली राऊस एव्हेन्यू कोर्टाने दिवसभराची सुनावणी संपली असल्याचे स्पष्ट करत यापुढील सुनावणी आता बुधवारी दि. १० एप्रिलला होणार आहे, असे म्हटले आहे. (Manish Sisodia bail plea)
सिसोदिया यांच्या जामीनाला ईडीचा विरोध
कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनीवणी दरम्यान ईडीने शनिवारी (दि.६) विरोध केला. सिसोदिया यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या नियमित जामीन याचिकेवर राऊस अव्हेन्यू न्यायालयातील विशेष सीबीआय न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या समोर ही सुनावणी पार पडली. दरम्यान ईडीचे विशेष वकील झोहेब हुसेन यांनी आज सिसोदिया यांनी दाखल केलेल्या जामीन याचिकेला विरोध केला आहे. (Manish Sisodia bail plea)
अनेक अर्ज नाकारल्यानंतर सिसोदिया यांचा पुन्हा ट्रायल कोर्टात जामीन अर्ज
सिसोदिया हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणातील ईडी आणि सीबीआय या दोन्ही केसमध्ये ट्रायल कोर्ट, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन नाकारला होता. जामीन नाकारल्याच्या विरोधात सिसोदिया यांच्या पुनर्विलोकन याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या होत्या. त्याच्या उपचारात्मक याचिकाही फेटाळण्यात आल्या आहेत. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी ट्रायल कोर्टात नव्याने जामीन अर्ज दाखल केला यावर आजची सुनावणी झाली. (Manish Sisodia bail plea)
‘या’ घोटाळा प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून अटक
दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात आपचे अनेक नेते संकंटात आहेत. ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. दरम्यान ईडीकडून आपच्या नेत्यांची चौकशी करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह बीआरएस नेत्या के.कविता देखील सध्या दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडी कोठडीत आहेत. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी 2023 रोजी सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर ईडीनेही त्यांना गेल्या वर्षी 9 मार्च रोजी अटक केली होती.
ED opposes Manish Sisodia bail plea in excise policy case, says accused delaying trial
report by @prashantjha996 #ManishSisodia @msisodia https://t.co/xuk0anX7g8
— Bar & Bench (@barandbench) April 6, 2024
हेही वाचा:
Manish Sisodia News: ‘लवकरच बाहेर भेटू, लव यू ऑल !’; मनीष सिसोदियांचे तुरूंगातून समर्थकांना पत्र
Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच; न्यायालयीन कोठडीत वाढ; २२ फेब्रुवारीला पुढील सुनावणी
Manish Sisodia News: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी घेतली आजारी पत्नीची भेट
Latest Marathi News सिसोदिया यांना दिलासा नाहीच; जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर Brought to You By : Bharat Live News Media.