सोलापूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सौर उर्जेवर चालणाऱ्या ई-सायकलची निर्मिती
सोलापूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा स्वतःच्या बुद्धीचा वापर करून पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सूर्यापासून मिळणा-या उर्जेचा वापर करून सोलार पॅनल च्या माध्यमातून ई- सायकल चा शोध लावला आहे.
या सायकलचे वजन २५ किलो असून यामध्ये ब्ल्यूटूथ इंडीकेटर, वायरलेस स्पीड मिटर, अपर-डिपर लाईट, ब्रेक लाईट, किल्ली स्वीच, लाईटिंग सेन्सॉर, कोड लॉक, हब मोटार दोन्ही टायरसाठी डिस्क ब्रेक, पाच प्रकारचे हॉर्न दोन्हीकडे स्टॅड, हिच पाँईट अशा विविध साहित्य वापरून चार्जिंग करून हि सायकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सत्यम कापले, लौकिक होले, साहिल इनामदार, सुशांक राऊत, अक्षय मेटकरी, रितेश येलपले, नाना वाघमारे, रोहित खपाले, गुरुनाथ कल्ली, दिग्विजय देशमुख, विद्या जमदाडे आणि दिगंता घवाणे या १० विद्यार्थ्यानी कायझेन या नावे ई सायकल तयार केली आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजने आयोजित केलेल्या आदित्य २ के २४ या राष्ट्रीय स्तरावरील इव्हेंट मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
हा प्रकल्प करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ श्याम कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा :
Mahayuti seat sharing | स्वतःच्या ताटात आधी वाढून घ्यायचे…; जागावाटपावरून शिंदे गट खरंच नाराज आहे का? शंभूराज देसाईंनी स्पष्टच सांगितले
Rainfall Forecast: उष्णतेच्या लाटेसह राज्यात ७ ते १० एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज
Israel and Iran conflict | मध्य पूर्वेत तणाव वाढला! इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेलाही दिला इशारा
Latest Marathi News सोलापूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सौर उर्जेवर चालणाऱ्या ई-सायकलची निर्मिती Brought to You By : Bharat Live News Media.