सांगलीच्या जागेवर लढण्यास काँग्रेस ठाम : विश्वजित कदम

नागपूर : पुढारी ऑनलाईन सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे. काँग्रेसची विचारधारा ही सांगलीच्या घराघरात पोहोचली आहे. त्‍यामुळे ही जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे असे ठाम भूमीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी मांडली आहे. नागपुरात रमेश चेन्निथलांच्या भेटीसाठी ते आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सांगली हा काँग्रेसी विचारधारेचा जिल्‍हा आहे. देशाच्या स्‍वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेसचे योगदान आहे. काँग्रेसने … The post सांगलीच्या जागेवर लढण्यास काँग्रेस ठाम : विश्वजित कदम appeared first on पुढारी.

सांगलीच्या जागेवर लढण्यास काँग्रेस ठाम : विश्वजित कदम

नागपूर : Bharat Live News Media ऑनलाईन सांगलीची जागा ही काँग्रेसची आहे. काँग्रेसची विचारधारा ही सांगलीच्या घराघरात पोहोचली आहे. त्‍यामुळे ही जागा काँग्रेसला मिळालीच पाहिजे असे ठाम भूमीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी मांडली आहे. नागपुरात रमेश चेन्निथलांच्या भेटीसाठी ते आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सांगली हा काँग्रेसी विचारधारेचा जिल्‍हा आहे. देशाच्या स्‍वातंत्र्य लढ्यापासून काँग्रेसचे योगदान आहे. काँग्रेसने अनेक क्षेत्रात काम केले आहे. सांगलीच्या जागेसाठी आम्‍ही दिल्‍लीतही पक्षश्रेष्‍टींसोबत चर्चा केली आहे. या जागेसाठी आम्‍ही प्रस्‍ताव दिला होता. त्‍यामुळे ही जागा आम्‍हाला मिळावी अशी आमची भूमीका आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्‍ट्रवादी आणि काँग्रेस या तीन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. दिल्‍लीत मल्‍लिकार्जुन खरगे यांची देखील आम्‍ही भेट घेतली आहे. त्‍यामुळे पक्षातील वरीष्‍ठ या बाबतीत योग्‍य निर्णय घेतील अशी भूमीका त्‍यांनी यावेळी मांडली.
दरम्‍यान संजय राउत यांच्या वक्‍तव्याबद्दल विचारले असता, ते काय बोलतात त्‍यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्‍याचे त्‍यांनी म्‍हटल आहे.
उद्धव ठाकरे गटाकडून सांगलीची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिवसेनेने त्यांचे उमेदवार जाहीर केले असले तरी, महाविकास आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यात मला पडायचे नाही. जे आमचे राज्यातील, दिल्लीतील नेते ठरवतील, महाविकास आघाडीत जे ठरेल, त्यानुसार काम करू असे ते म्‍हणाले.
हेही वाचा :

सांगलीत ठाकरे सेनेच्या उमेदवारालाच लोकांचा पाठिंबा : संजय राऊत 
Rainfall Forecast: उष्णतेच्या लाटेसह राज्यात ७ ते १० एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज

Nashik Lok Sabha Election 2024 | वॉर रुममधून तापतोय निवडणूक ज्वर, सोशल मीडीयाच्या माध्यमातून प्रचारात येणार रंगत 

Latest Marathi News सांगलीच्या जागेवर लढण्यास काँग्रेस ठाम : विश्वजित कदम Brought to You By : Bharat Live News Media.