भुसावळच्या तरुणाचा दिव दमण येथे खून

जळगाव- भुसावळ शहरातील नारायण नगर येथील रहिवासी मित्रांसोबत दिव दमणला गेला होता. तेथे ढाब्यावर तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादातून त्या तरुणाने चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना (दि. ३) रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील निवृत्त सहाय्यक फौजदार अरुण जाधव यांचा मुलगा धीरज अरुण जाधव (रा. … The post भुसावळच्या तरुणाचा दिव दमण येथे खून appeared first on पुढारी.

भुसावळच्या तरुणाचा दिव दमण येथे खून

जळगाव- भुसावळ शहरातील नारायण नगर येथील रहिवासी मित्रांसोबत दिव दमणला गेला होता. तेथे ढाब्यावर तरुणाशी त्याचा वाद झाला. या वादातून त्या तरुणाने चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना (दि. ३) रोजी रात्री घडली आहे. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील निवृत्त सहाय्यक फौजदार अरुण जाधव यांचा मुलगा धीरज अरुण जाधव (रा. नारायण नगर, ) हा चुलत भाऊ भूषण आणि अविनाश जाधव व अन्यमित्रांसह दिव दमण येथे फिरायला गेला होता. तेथे एका दमण धाब्यावर जेवायला गेला होता. अमरेली जवळच्या धारी येथील एक तरुण प्रद्युम्न सिंह गोहिल आला होता. त्याच्यात व मयत धीरज यांच्यात वाद झाला. या वादातून त्या तरुणाने धीरज जाधव याच्या मानेवर चाकूने वार केला.
त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून धीरज जाधव याच्यावर शुक्रवारी ५ एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संबंधित पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीच धीरजचा विवाह झाला होता. पुणे येथे एका नामांकित कंपनीत तो अभियंता होता.
हेही वाचा –

Nashik Lok Sabha Election 2024 | जिल्ह्यासाठी १३ हजार शाईच्या बाॅटल्स‌, प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॉटल देणार
नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ‘डॅमेज कंट्रोल’ ; नाराजीनाट्यानंतर दगाफटका टाळण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
कल्याणमधून श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार; फडणवीसांची मोठी घोषणा

Latest Marathi News भुसावळच्या तरुणाचा दिव दमण येथे खून Brought to You By : Bharat Live News Media.