मध्य पूर्वेत तणाव वाढला! इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेलाही दिला इशारा

पुढारी ऑनलाईन : सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी इराणने केली आहे. इराण एका “महत्त्वाच्या” हल्ल्याची तयारी करत असल्याने अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इराण पुढील आठवड्यात इस्रायली अथवा अमेरिकन मालमत्तांना लक्ष्य करू शकतो, असे वृत्त सीएनएनने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. … The post मध्य पूर्वेत तणाव वाढला! इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेलाही दिला इशारा appeared first on पुढारी.

मध्य पूर्वेत तणाव वाढला! इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेलाही दिला इशारा

Bharat Live News Media ऑनलाईन : सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याची तयारी इराणने केली आहे. इराण एका “महत्त्वाच्या” हल्ल्याची तयारी करत असल्याने अमेरिकेतील सुरक्षा यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. इराण पुढील आठवड्यात इस्रायली अथवा अमेरिकन मालमत्तांना लक्ष्य करू शकतो, असे वृत्त सीएनएनने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. (Israel and Iran conflict)
सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा अपेक्षित हल्ला केला जाणार असल्याचे समजते. इराणच्या दूतावासावरील हल्ल्यात त्यांच्या एका वरिष्ठ कमांडरचा मृत्यू झाला होता.
वरिष्ठ अमेरिकन आणि त्यांच्या इस्रायलमधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की इराणकडून होणारा हल्ला “अटळ” आहे. इराणने प्रत्युत्तर म्हणून हल्ला करण्याची योजना केव्हा आणि कशी आखली आहे, हे दोन्ही सरकारांना शुक्रवारपर्यंत माहित नव्हते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
सीरियाच्या राजधानीत इराणच्या दुतावासावर झालेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRCG)चे निमलष्करी दल कुड्स फोर्सचा प्रमुख कमांडर जनरल मोहम्मद रजा जाहेदी ठार झाला होता. २०२० मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात कुड्स फोर्स कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी मारला गेल्यानंतरची ही सर्वात हाय-प्रोफाइल हत्येची घटना होती.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांनी इराणच्या सूड भावनेच्या भूमिकेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की इराणकडून मुख्यतः नागरिकांऐवजी लष्करी आणि गुप्तचर यंत्रणांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे, असे एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (Israel and Iran conflict)
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की प्रशासनाने इराणच्या कोणत्याही हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे या पर्यायांवर विचार करण्यास सुरुवात केली आहे. ते ड्रोन अथवा जमिनीवर हल्ला करणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करू शकतात.
अमेरिकेला दूर राहण्याचा इशारा
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या एका उच्च सहाय्यकाने अमेरिकेला दिलेल्या कठोर संदेशात, इराण आणि इस्रायल याच्यातील संघर्षात तुम्हाला हानी होऊ नये म्हणून तुम्ही दूर राहावे, असा इशारा दिला आहे.
हे ही वाचा :

न्यूजर्सी, न्यूयॉर्क शहर ११ धक्क्यांनी हादरले, २४० वर्षांतील सर्वात मोठा भूकंप (video)
पाकिस्‍तान लष्‍कराकडून माझ्‍या पत्‍नीवर विषप्रयोग : इम्रान खान यांचा आरोप
भारत कुठल्याही क्षणी आमच्यावर हल्ला करणार! : मुनीर अक्रम

Latest Marathi News मध्य पूर्वेत तणाव वाढला! इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत, अमेरिकेलाही दिला इशारा Brought to You By : Bharat Live News Media.