लासलगावी खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा -येथील खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस तुला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड आणि सुमित संजय भडांगे रा. गणेश नगर लासलगाव यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ मार्च रोजी दुपारी साडेचार वाजताचे सुमारास लासलगाव येथील ग्रामपंचायत हॉल जवळील. खाजगी क्लास मध्ये यातील विद्यार्थिनी ही अल्पवयीन आहे असे माहित असताना देखील संशयित यांनी तुला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन तीच्याशी जवळीक साधुन लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड 2) सुमित संजय भडांगे रा. गणेश नगर लासलगाव यांचे विरुद्ध भादवी का. कलम 354,354 (अ), (ड), 34, सह पोक्सो का. कलम 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरासे करीत आहेत.
लासलगाव पोलीस कार्यालयात वरील गुन्हा दाखल झाला असून याबाबत पालक अगर विद्यार्थिनी यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी लासलगाव पोलिसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा :
BJP Foundation Day 2024 | ‘भाजप’ देशातील पसंतीचा पक्ष; लोक आणखी एक संधी देतील, भाजप स्थापनादिनी पीएम मोदींचा संदेश
नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला
Latest Marathi News लासलगावी खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल Brought to You By : Bharat Live News Media.