रावेर लोकसभेत खळबळ ! अमोल जावळे शरद पवारांची तुतारी फुंकणार?

जळगाव-पुढारी वृत्तसेवा– जळगाव मध्ये राजकीय हालचालींना वेग वाढलेला आहे. उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांना सोबत घेऊन राजकीय भूकंप केला तसेच भाजपाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे सुद्धा मोठ्या राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत तिकिटाची ऑफर केल्याच्या वृत्ताने … The post रावेर लोकसभेत खळबळ ! अमोल जावळे शरद पवारांची तुतारी फुंकणार? appeared first on पुढारी.

रावेर लोकसभेत खळबळ ! अमोल जावळे शरद पवारांची तुतारी फुंकणार?

जळगाव-Bharat Live News Media वृत्तसेवा– जळगाव मध्ये राजकीय हालचालींना वेग वाढलेला आहे. उन्मेष पाटील यांनी करण पाटील यांना सोबत घेऊन राजकीय भूकंप केला तसेच भाजपाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे हे सुद्धा मोठ्या राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने थेट भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांच्याशी संपर्क साधत तिकिटाची ऑफर केल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावेर लोकसभेमध्ये जावळे विरुध्द रक्षा खडसे असे चित्र तर दिसणार नाही. यामुळे भाजपवर किंवा राज्यावर येणाऱ्या संकटाला तोंड देणारे व संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश महाजन हेच संकटात आलेले दिसत आहे.
रावेर लोकसभा ही भाजपाच्या दृष्टीने बालेकिल्ला आहे. हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापून तत्कालीन नेते एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना टिकीट दिले होते त्या दोन वेळा या मतदारसंघातून खासदार झालेले आहे मात्र तिसऱ्या वेळेस त्यांना तिकीट मिळवून देणारे त्यांचे सासरे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत गेल्यामुळे त्यांना तिकीट मिळणार नाही अशी चिन्हे दिसत होती .तरी सुद्धा रक्षा खडसे यांचे नाव पुन्हा तिसऱ्या टर्म साठी जाहीर झाले.
जेव्हा की रावेर लोकसभेमध्ये हरिभाऊ जावळे याचे सुपुत्र व रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नावाची चर्चा व यांनाच तिकीट मिळणार अशी नागरिकांची खात्री होती. त्यांचे नाव न आल्यामुळे अनेकांनी राजीनामे दिले होते. भाजपामध्ये प्रथमच शिस्त बाजूला ठेवून नागरिकांनी आपले प्रेम व इच्छा राजीनामातून व्यक्त केले. यामध्ये पुन्हा गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून सर्वांना कामाला लागण्याचे सांगितले. नाराज झालेले अमोल जावळे यांनी होकार भरला तरी मनातून नाराज होतेच. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. आता निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असतांना ते भाजपला जय श्रीराम करत शरद पवार गटाच्या वतीने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.? की ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार व त्याला महाविकास आघाडी व हरिभाऊ जावळे यांनी जमा केलेले समर्थक समर्थन देणार !
मोदींनाच पंतप्रधान बनवणे उद्दिष्ट – जावळे
अमोल हरीभाऊ जावळे यांच्या समोर सद्यस्थितीत हे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. यात पहिल्या पर्यायात त्यांनी थेट शरद पवार गटाच्या वतीने तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा अपक्ष म्हणून त्यांनी मैदानात उतरावे असा दुसरा पर्याय देण्यात आलेला आहे. या दोन्ही पर्यायांपैकी एक पर्याय स्वीकारून ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनविणे हेच आपले उद्दीष्ट असल्याचे ते म्हणाले.
जळगाव लोकसभेत भूकंप झाल्यानंतर रावेर लोकसभेत भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आधीच उन्मेष पाटील यांच्या रूपाने एक माजी खासदार तर करण पवारांच्या माध्यमातून खंदा शिलेदार भाजपने गमावला असल्याने याची थेट दिल्ली दरबारी दखल घेण्यात आली आहे. यातच आता जर थेट जिल्हाध्यक्षच पदाचा राजीनामा देऊन हातात तुतारी धरत असेल तर ती पक्षासाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. तर, पुढे नेमके काय होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमोल जावळे हे खरोखरीस राजकीय भूकंप करणार की माघार घेणार ? हे येत्या दोन दिवसांत कळणार आहे.
Latest Marathi News रावेर लोकसभेत खळबळ ! अमोल जावळे शरद पवारांची तुतारी फुंकणार? Brought to You By : Bharat Live News Media.