कोल्हापूर : रंकाळा टॉवर खूनप्रकरणी म्होरक्यासह 8 गजाआड
कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : रंकाळा टॉवर येथे गुरुवारी भरदिवसा झालेल्या अजय ऊर्फ रावण दगडू शिंदे (वय 25, रा. डवरी वसाहत, यादवनगर) याच्या खूनप्रकरणी टोळीचा म्होरक्या रोहित अर्जुन शिंदे (वय 20, रा. डवरी वसाहत) याच्यासह आठजणांना शुक्रवारी अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण व जुना राजवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. न्यायालयाने मारेकर्यांना 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
म्होरक्या रोहित शिंदेसह राज संजय जगताप (21, रा. सायबर चौक), आकाश आनंदा माळी (21, रा. बालिंगा, मूळ गाव जुना नांदणी नाका, जयसिंगपूर), सचिन दिलीप माळी (19), नीलेश उत्तम माळी (21), गणेश सागर माळी (19, डवरी वसाहत, यादवनगर), प्रशांत संभाजी शिंदे (21, बीड शेड, करवीर), नीलेश बाबर (21, सायबर चौक, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वर्चस्व वादातून रोहित शिंदेसह साथीदारांनी रंकाळा टॉवर परिसरात हल्ला करून रावण टोळीचा म्होरक्या अजय ऊर्फ रावण शिंदे याचा खून केला होता. गुरुवारी ही थरारक घटना घडली होती. हल्ल्यातील 7 संशउयतांना इस्पुर्लीत, तर नीलेश बाबरला सायबर चौकातून ताब्यात घेण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्रकुमार कळमकर यांनी सांगितले.
Latest Marathi News कोल्हापूर : रंकाळा टॉवर खूनप्रकरणी म्होरक्यासह 8 गजाआड Brought to You By : Bharat Live News Media.