गांधीनगरात भांडण सोडविण्यास गेलेल्यावर चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा

गांधीनगर, पुढारी वृत्तसेवा : भांडण सोडविण्यास गेलेल्या आशुतोष ऊर्फ योगेश अरुण कांबळे (वय 24, रा. इंदिरानगर वसाहत, गांधीनगर) याच्यावर चाकूहल्ला केल्याबद्दल समीर मेहबूब नदाफ, इरफान मेहबूब नदाफ आणि सलीम दावलसाब नदाफ (सर्व रा. इंदिरानगर वसाहत, गांधीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जुन्या वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. आशुतोष याचा मित्र निहाल राजेंद्र लाड आणि इरफान … The post गांधीनगरात भांडण सोडविण्यास गेलेल्यावर चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा appeared first on पुढारी.

गांधीनगरात भांडण सोडविण्यास गेलेल्यावर चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा

गांधीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : भांडण सोडविण्यास गेलेल्या आशुतोष ऊर्फ योगेश अरुण कांबळे (वय 24, रा. इंदिरानगर वसाहत, गांधीनगर) याच्यावर चाकूहल्ला केल्याबद्दल समीर मेहबूब नदाफ, इरफान मेहबूब नदाफ आणि सलीम दावलसाब नदाफ (सर्व रा. इंदिरानगर वसाहत, गांधीनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. जुन्या वादातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.
आशुतोष याचा मित्र निहाल राजेंद्र लाड आणि इरफान यांच्यात वादावादी सुरू होती. आशुतोष याने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आशुतोष याला शिवीगाळ करत इरफान आणि सलीम यांनी त्याचे हात दाबून धरले, तर समीर याने आशुतोषच्या पोटावर चाकूने वार केले. त्यात आशुतोष गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला उपचारांकरिता गांधीनगर येथील वसाहत रुग्णालय आणि त्यानंतर सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, आशुतोष याने गांधीनगर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार समीर, इरफान आणि सलीम यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव करत आहेत.
Latest Marathi News गांधीनगरात भांडण सोडविण्यास गेलेल्यावर चाकूहल्ला; तिघांवर गुन्हा Brought to You By : Bharat Live News Media.