नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी, जिल्हयाभरात एकाचवेळी 44 आरोपींना अटक

नंदुरबार – पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात वॉरंट बजावणीची मोहीम सुरु असून मागील 20 दिवसात जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमार्फत अ-जामीनपात्र वॉरंट मधील एकूण 44 इसमांना अटक करण्यात आली. न्यायालयाने यापुर्वी समन्स काढले होते, त्या समन्सची बजावणी पोलीसांनी केली होती. समन्स बजावूनही त्यातील इसम न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले … The post नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी, जिल्हयाभरात एकाचवेळी 44 आरोपींना अटक appeared first on पुढारी.

नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी, जिल्हयाभरात एकाचवेळी 44 आरोपींना अटक

नंदुरबार – पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयात वॉरंट बजावणीची मोहीम सुरु असून मागील 20 दिवसात जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमार्फत अ-जामीनपात्र वॉरंट मधील एकूण 44 इसमांना अटक करण्यात आली.
न्यायालयाने यापुर्वी समन्स काढले होते, त्या समन्सची बजावणी पोलीसांनी केली होती. समन्स बजावूनही त्यातील इसम न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते, जामिनपात्र वॉरंटाची देखील बजावणी पोलीस ठाण्यांमार्फत करण्यात आली होती, परंतु जामीनपात्र वॉरंटातही काही इसम गैरहजर राहिले. आता न्यायालयाच्या आदेशान्वये त्या 44 इसमांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी, अक्कलकूवा सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांनी केली.
Latest Marathi News नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी, जिल्हयाभरात एकाचवेळी 44 आरोपींना अटक Brought to You By : Bharat Live News Media.