पटोलेंनी काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट पाडली : प्रकाश आंबेडकर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजूनही वेळ गेलेली नाही. अर्ज माघारी घेण्यापर्यंत वेळ आहे. तुम्हाला किती जागा पाहिजे ते सांगा, असे आवाहन करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट खर्‍या अर्थाने पटोले यांनी पाडली आहे. यासंदर्भात जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पकडले तेव्हापासून महाविकास … The post पटोलेंनी काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट पाडली : प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.

पटोलेंनी काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट पाडली : प्रकाश आंबेडकर

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : अजूनही वेळ गेलेली नाही. अर्ज माघारी घेण्यापर्यंत वेळ आहे. तुम्हाला किती जागा पाहिजे ते सांगा, असे आवाहन करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट खर्‍या अर्थाने पटोले यांनी पाडली आहे. यासंदर्भात जेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पकडले तेव्हापासून महाविकास आघाडीच्या बैठकीत पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात यांना पाठवू लागले, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
पटोलेंच्या ऑफरवर आंबेडकर यांनी ‘एक्स’वर ट्विट करून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पटोलेंनी अकोलामध्ये येऊन जॉनी वॉकरसारखा जबरदस्त अभिनय केला. तुम्हाला संविधान वाचवायचे होते, तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकरांना महाविकास आघाडीच्या बैठकीत दीड तास बाहेर का बसवले, असा सवाल करत काँग्रेस आणि आमच्या नात्यात फूट टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने बाळासाहेब थोरात महाविकास आघाडीच्या बैठकीला येऊ लागले होते, असे सांगत या गोष्टी त्यांनी अकोल्यामध्ये सांगायला हव्या होत्या, असा खोचक सल्लाही आंबेडकर ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
Latest Marathi News पटोलेंनी काँग्रेस आणि वंचितमध्ये फूट पाडली : प्रकाश आंबेडकर Brought to You By : Bharat Live News Media.