पाकिस्तानात प्रशासनाने पुन्हा पाडली हिंदू मंदिरे
कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानात पुन्हा एकदा धार्मिक अल्पसंख्याकांवर तेथील प्रशासनाने बडगा उगारला असून, सिंध प्रांतातील दोन महत्त्वाची हिंदू मंदिरे बुलडोझर लावून पाडण्यात आली आहेत. त्यात सिंध प्रांंतातील हिंगलाज मातेचे एक मंदिर आणि ‘एलओसी’जवळचे शारदा पीठ मंदिर यांचा समावेश आहे. यातील शारदा पीठ मंदिर ‘युनेस्को’च्या यादीतील वास्तू आहे.
पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांना नेहमीच टार्गेट केले जाते. खासकरून हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना अधिक आहेत. याबाबत अमेरिका, भारतासह अनेक देशांनी पाकिस्तानची नेहमीच निंदा केली आहे; तरीही पाकिस्तानात सरकारी आशीर्वादासह हे प्रकार सुरूच असतात.
ताज्या घटना हिंदूंची चिंता वाढवणार्या असून, त्यात प्रशासनाने अनेक हिंदू मंदिरे बुलडोझर लावून भुईसपाट केली आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपरकर जिल्ह्यातील मिथी गावात असलेले हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या हिंगलाज मातेचे मंदिर प्रशासनाने पाडून टाकले. हे मंदिर बेकायदा असल्याने न्यायालयाच्या आदेशाने ते पाडल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
दुसरी धक्कादायक घटना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकच्या भागात घडली. तेथे कॉफी हाऊसच्या आड येते म्हणून चक्क ‘युनेस्को’च्या यादीतील मंदिर पाडून टाकण्यात आले. विशेष म्हणजे, या मंदिराला हात लावू नये, असे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना प्रशासनाने एका रात्रीत हे मंदिर पाडले. शारदा पीठ मंदिर नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर ‘युनेस्को’च्या यादीत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार ‘युनेस्को’ यादीतील मंदिर सांभाळणे व त्याचे संवर्धन करणे ही त्या देशाची जबाबदारी असते. हे सारे नियम व कायदे पायदळी तुडवत पाकिस्तानात पुन्हा एकदा मंदिरे पाडण्यात आली आहेत.
The post पाकिस्तानात प्रशासनाने पुन्हा पाडली हिंदू मंदिरे appeared first on पुढारी.
कराची; वृत्तसंस्था : पाकिस्तानात पुन्हा एकदा धार्मिक अल्पसंख्याकांवर तेथील प्रशासनाने बडगा उगारला असून, सिंध प्रांतातील दोन महत्त्वाची हिंदू मंदिरे बुलडोझर लावून पाडण्यात आली आहेत. त्यात सिंध प्रांंतातील हिंगलाज मातेचे एक मंदिर आणि ‘एलओसी’जवळचे शारदा पीठ मंदिर यांचा समावेश आहे. यातील शारदा पीठ मंदिर ‘युनेस्को’च्या यादीतील वास्तू आहे. पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांना नेहमीच टार्गेट केले जाते. खासकरून …
The post पाकिस्तानात प्रशासनाने पुन्हा पाडली हिंदू मंदिरे appeared first on पुढारी.