जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून टँकर ग्रस्त गावाची पाहणी

जळगाव- पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. यावेळी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्याकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील पाणी टंचाई व जनावराच्या चाऱ्या बाबतीत माहिती घेऊन संभाव्य परिस्थिती जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या … The post जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून टँकर ग्रस्त गावाची पाहणी appeared first on पुढारी.

जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून टँकर ग्रस्त गावाची पाहणी

जळगाव- पारोळा तालुक्यातील खेडीढोक येथे टँकर ग्रस्त गावाची पाहणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अनिकेत पाटील यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी गटविकास अधिकारी किशोर शिंदे यांच्याकडून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मधील पाणी टंचाई व जनावराच्या चाऱ्या बाबतीत माहिती घेऊन संभाव्य परिस्थिती जाणून घेऊन त्याबाबत करावयाच्या उपाययोजना /कार्यवाही बाबतीत सूचना दिल्या. तसेच जलजीवन योजनेच्या सुरु असलेल्या योजना त्वरित पूर्ण करण्याबरोबर मनरेगा अंतर्गत कामे करणे, शाळांना संरक्षण भिंतीचे कामे पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. ग्रामसेवविका ग्रामस्थ तसेच डेप्युटी इंजिनियर धीरज पाटील,विस्तार अधिकारी सुनील पाटील. शाखा अभियंता संदीप सोनवणे यावेळी हजर होते.
Latest Marathi News जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडून टँकर ग्रस्त गावाची पाहणी Brought to You By : Bharat Live News Media.