तृणमूल नेत्‍याची हत्‍या, जमावाच्‍या मारहाणीत हल्‍लेखोराचा मृत्‍यू

तृणमूल नेत्‍याची हत्‍या, जमावाच्‍या मारहाणीत हल्‍लेखोराचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील जयनगरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जमावाने हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली. यामध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला आहे.
तृणमूल काँग्रेसचे जयनगरचे अध्‍यक्ष सैफुद्दीन लस्कर यांना त्यांच्या निवासस्थानाबाहेर काही हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. लस्‍कर समर्थकांनी आणि सरपंच असलेल्‍या पत्नीने हल्लेखोरांपैकी एकाला पकडले. यावेळी जमावाने हल्‍लेखोरास बेदम मारहाण केली. तृणमूल काँग्रेसच्‍या स्‍थानिक नेत्‍यांनी या हत्‍येमागे कम्‍युनिस्‍ट पार्टी आणि इंडियाच्‍या समर्थकांना जबाबदार धरले.तर सीपीआय(एम) समर्थकांनी असा दावा केला की हत्येनंतर लस्करच्या समर्थकांनी त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली आणि त्यांना आग लावली.
तृणमूल काँग्रसच्‍या नेत्याच्या हत्येनंतर, सीपीआय (एम) केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करुन आरोपींना तत्‍काळ अटक करावी. दरम्‍यान, याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे
हेही वाचा : 

Tiger 3 : टायगर 3 च्या रिलीजवेळी थिएटरमध्ये फटाके, सलमान खान म्हणाला…
Uttarkashi Tunnel Collapse : जगण्याची लढाई युद्धपातळीवर : बोगद्यात अडकलेले सर्व ४० मजूर सुरक्षित

 
 
 
The post तृणमूल नेत्‍याची हत्‍या, जमावाच्‍या मारहाणीत हल्‍लेखोराचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील जयनगरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जमावाने हल्लेखोराला पकडून बेदम मारहाण केली. यामध्‍ये त्‍याचा मृत्‍यू झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे जयनगरचे अध्‍यक्ष सैफुद्दीन लस्कर यांना त्यांच्या निवासस्थानाबाहेर काही हल्लेखोरांनी गोळ्या घातल्या. लस्‍कर समर्थकांनी आणि सरपंच असलेल्‍या पत्नीने हल्लेखोरांपैकी एकाला पकडले. यावेळी जमावाने हल्‍लेखोरास …

The post तृणमूल नेत्‍याची हत्‍या, जमावाच्‍या मारहाणीत हल्‍लेखोराचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

Go to Source