छत्तीसगड : ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर अग्नितांडव! वीज विभागाचे गोदाम जळून खाक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Transformer Blast : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला शुक्रवारी अचानक भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने आकाशात दूरवर धुराचे लोट दिसत होते. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती … The post छत्तीसगड : ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर अग्नितांडव! वीज विभागाचे गोदाम जळून खाक appeared first on पुढारी.

छत्तीसगड : ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर अग्नितांडव! वीज विभागाचे गोदाम जळून खाक

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Transformer Blast : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये शुक्रवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाला शुक्रवारी अचानक भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केल्याने आकाशात दूरवर धुराचे लोट दिसत होते. आग वाढत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमधील गुढियारी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौकाजवळील विद्युत विभागाच्या उपविभागीय कार्यालयाच्या गोदामात ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. गोदामात ठेवलेले 1500 ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाले. गोदामात सुमारे 6 हजार ट्रान्सफॉर्मर ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरातील सर्व घरे रिकामी करण्यात आली.

#WATCH रायपुर, छत्तीसगढ़: बिजली वितरण कंपनी के परिसर में भीषण आग लगी। दमकल की गाड़ियां मौके पर मौजूद हैं। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/nZV9FlNw3m
— ANI_HindiNews (@AHindinews) April 5, 2024

#WATCH | People vacate their homes located near the power distribution company after a massive fire broke out in it in Raipur’s Kota area; police and firefighters present on the spot.#Chhattisgarh pic.twitter.com/yxLXzUOURU
— ANI (@ANI) April 5, 2024

Latest Marathi News छत्तीसगड : ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटानंतर अग्नितांडव! वीज विभागाचे गोदाम जळून खाक Brought to You By : Bharat Live News Media.