जळगावी हरणाची शिकार करुन मांस शिजवणाऱ्याला अटक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – सातपुडा पर्वतांच्या वन जंगलात क्षेत्रातील व यावल तालुक्यातील काळाडोह या वनविभागाच्या परिसरात हरणाची शिकार करून तिचे मांस शिजवणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची वन कठोडी दिली आहे. या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील काळाडोह या … The post जळगावी हरणाची शिकार करुन मांस शिजवणाऱ्याला अटक appeared first on पुढारी.

जळगावी हरणाची शिकार करुन मांस शिजवणाऱ्याला अटक

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा – सातपुडा पर्वतांच्या वन जंगलात क्षेत्रातील व यावल तालुक्यातील काळाडोह या वनविभागाच्या परिसरात हरणाची शिकार करून तिचे मांस शिजवणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला एका दिवसाची वन कठोडी दिली आहे.
या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रातील काळाडोह या ठीकाणी भेकर या प्रजातीची शिकार करून मांस शिवजवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व तसेच व वनक्षेत्राचे पथकासह मौजे काळाडोह पाड्यावर जाऊन संशयीत आरोपी हवालदार नहारसिंग बारेला याला सापळा रचून त्याच्या राहत्या घरात हरीणाचे मांस शिजवताना रंगेहाथ पकडले. तसेच त्याला चौकशी साठी ताब्यात घेतले.
या प्रकरणी वनपाल डोंगर कठोरा यांनी आरोपीस (दि. ४) रोजी न्यायाधीश यावल यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची वनकोठडी दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव, प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक यावल, यावल पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाई मध्ये यावल पूर्व वनक्षेत्रातील कर्मचारी राजेन्द्र तायडे, बी. बी. गायकवाड यांच्यासह पुर्व विभागाचे व पश्चीम क्षेत्राचे कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी व सर्व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सहभागी घेतला.
हेही वाचा –

Nashik News | पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू
Congress Party manifesto | काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, ५ न्याय, २५ गॅरंटी, गरीब महिलांना १ लाख, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन
Arun Gawli Will Be Released| मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून सुटणार, हायकोर्टाचा आदेश

Latest Marathi News जळगावी हरणाची शिकार करुन मांस शिजवणाऱ्याला अटक Brought to You By : Bharat Live News Media.