पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील झोडगे येथे गावाजवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा गुरुवारी (दि.4) रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) असे मृत्यूमुखी पडलेल्या माय लेकीचे नावे आहेत. त्यांच्या माळमाथा भागासह झोडगे परिसरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झोडगेसह परिसरात सद्या वीस दिवसानंतर … The post पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू appeared first on पुढारी.

पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : Bharat Live News Media वृत्तसेवा- तालुक्यातील झोडगे येथे गावाजवळ असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा गुरुवारी (दि.4) रोजी विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. निताबाई जाधव (वय 47) व इच्छामणी जाधव (वय 16) असे मृत्यूमुखी पडलेल्या माय लेकीचे नावे आहेत. त्यांच्या माळमाथा भागासह झोडगे परिसरात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. झोडगेसह परिसरात सद्या वीस दिवसानंतर गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होते. शेत शिवारातील अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. ज्या काही विहिरींना थोडेफार पाणी उपलब्ध आहे. अशा ठिकाणी गावातील महिला कपडे धुण्यासाठी व पाण्यासाठी विहिरींवर जातात. तर पशुपालक शेत शिवारातील विहिरींवर जाऊन जनावरांची तहान भागवत आहेत.
गावातील निताबाई व त्यांची मुलगी ईच्छामणी या गुरुवारी दुपारच्यावेळी गावा शेजारी असलेल्या विहिरीवर धुणे धुण्यासाठी व पाणी भरण्यासाठी विहिरींवर गेल्या होत्या. दोर बादलीच्या सहाय्याने विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सायंकाळच्या सुमारास शेळ्या-मेंढ्या चारणारे पशुपालक घराकडे येत असताना त्यांना विहिरीत बुडालेल्या मायलेकी दिसल्या. या घटनेची माहिती त्यांनी गावात देताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस नाईक सतीश मोरे, पोलीस शिपाई मयूर भावसार, राऊत तसेच तलाठी सुधीर कदम आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. विहिर पडलेल्या मायलेकींना बाहेर काढत शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करुन त्याना मृत्यू घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निताबाई या येथील कोतवाल शिवाजी जाधव यांच्या आई तर इच्छामणी बहिण होत.
हेही वाचा :

Lok Sabha Election 2024 | ‘ईव्हीएम’साठी पंधराही तालुक्यांना स्ट्राँगरूम, मतदानासाठी प्रशासनाची तयारी
Sanjay Singh Press: तुरुंगातून सुटका होताच, आप खासदार संजय सिंह यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘भाजप…’
Sanjay Singh Press: तुरुंगातून सुटका होताच, आप खासदार संजय सिंह यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, ‘भाजप…’

Latest Marathi News पाणी टंचाईने घेतला बळी! माय लेकींचा विहिरीतून पाणी काढताना पडून मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.