पुणे : लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही म्हणून पत्नीने केला पतीचा खून
पुणे ः पुढारी वृत्तसेवा : पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही, याचा राग मनात धरून बांधकाम व्यावसायिक पतीचा पत्नीने तोंडावर आणि नाकावर मारहाण करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वानवडी येथील गंगा सॅटेलाईट सोसायटी येथे घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. निखिल पुष्पराज खन्ना (36, रा गंगा सॅटेलाईट, वानवडी) असे मृत्यू झालेल्या बांधकाम व्यावसायीकाचे नावे आहे. या प्रकरणी पत्नी रेणुका निखील खन्ना (38) हीला याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मुलाचे वडील डॉ. पुष्पराज कृष्णलाल खन्ना (66, रा. गंगा सॅटेलाईट, वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पराज खन्ना, त्यांची पत्नी तसेच मुलगा निखील आणि सुन रेणुका यांच बरोबर गंगा सॅटेलाईट येथे राहण्यास होते. त्यांचे वानवडी येथील हॅली सोसायटीमध्ये स्पर्श पॉलीक्लिनीक नावाने क्लिनीक आहे. तर मुलगा निखिल हा रिअल इस्टेटचे काम करत होता. त्याचे वानवडी येथे सिक्रेड वर्ल्ड नावाचे ऑफीस होते. तर त्यांचे नानापेठ येथे सिटी वर्ल्ड नावाची स्कुल आहे. त्याची सर्व व्यवस्था त्यांची पत्नी पाहत होती. निखील याचा 2017 मध्ये रेणुका हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये वारंवार शुल्लक कारणावरून वाद होत होते. तिला समजाऊन सांगूनही तिच्या वागण्यात काही सुधारणा होत नव्हती. तिचे घरातील नोकरांशीही सतत वाद होत असायचे. रेणुका हिचा 29 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता. तिला वाढदिवस दुबई येथे जाऊन साजरा करायचा होता. मात्र निखील तिला घेऊन जात नव्हता. तसेच 5 नोव्हेंबरला तिला मनासारखे गिफ्ट न दिल्यामुळे त्याच्यात वाद झाले होते. यावेळी तिने निखीलला मारहाणही केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच रेणुकाला तिच्या भावाच्या मुलाच्या वाढदिवसाला दिल्लीला विमानाने जायचे होते. तिच्या विमानाच्या तिकीटाची व्यवस्था त्याने करून दिल्याने त्यांच्यात वाद झाले होते.
शुक्रवारी सकाळी फिर्यादी यांची पत्नी नेहमी प्रमाणे शाळेत तर फिर्यादी क्लिनीकमध्ये गेले. घरी रेणुका आणि निखील दोघेच होते. रेणुका हिचा फिर्यादींना निखील आणि तिचे भांडण झाल्याचा कॉल आला. तिने त्यांना लवकर या असे सांगतले. ते घरी पोहचल्यानंतर निखील हे फरशीवर पडले होते. तसेच त्यावेळी सून बाजुला बेडवर बसली होती. त्याच्या नाका तोंडातून रक्त येत होते. त्याला फिर्यादींनी सीपीआर देऊन तोंडाद्वारे श्वास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, निखीलची काही हालचाल होत नसल्याने रुग्णवाहिका बोलवली. डॉक्टरांनी त्याला ससुन रूग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. ससून रूग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासल्यानंतर त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषीत केले.
आम्हाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन याबाबत तपास केला असता पत्नीनेच पतीच्या नाकावर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून त्याच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
– संजय पतंगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे.
हेही वाचलंत का?
Abhyudaya Co. Bank : आरबीयाची मोठी कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती
Bhogavati Sugar Factory: ‘भोगावती’च्या नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांची १ डिसेंबररोजी निवड
The post पुणे : लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही म्हणून पत्नीने केला पतीचा खून appeared first on पुढारी.
पुणे ः पुढारी वृत्तसेवा : पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही, याचा राग मनात धरून बांधकाम व्यावसायिक पतीचा पत्नीने तोंडावर आणि नाकावर मारहाण करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना वानवडी येथील गंगा सॅटेलाईट सोसायटी येथे घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. निखिल पुष्पराज खन्ना (36, रा गंगा सॅटेलाईट, वानवडी) असे मृत्यू झालेल्या …
The post पुणे : लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला नेले नाही म्हणून पत्नीने केला पतीचा खून appeared first on पुढारी.