RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : Abhyudaya Co. Bank : बँकेचा प्रशासकीय व्यवहार योग्य नसल्याचा ठपका ठेवून रिझर्व बँकेने आज अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित करीत 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. मात्र बँकेवर ही कारवाई करताना ग्राहकांवर आर्थिक व्यवहारांसाठी कुठलेही निर्बध लागू केले नसल्याचे ही रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे अभ्युदय बँकेच्या ग्राहकांमध्ये … The post RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती appeared first on पुढारी.
#image_title

RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : Abhyudaya Co. Bank : बँकेचा प्रशासकीय व्यवहार योग्य नसल्याचा ठपका ठेवून रिझर्व बँकेने आज अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित करीत 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. मात्र बँकेवर ही कारवाई करताना ग्राहकांवर आर्थिक व्यवहारांसाठी कुठलेही निर्बध लागू केले नसल्याचे ही रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे अभ्युदय बँकेच्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.
1965 मध्ये स्थापन झालेल्या आणि 2 लाख 23 हजार सदस्य असलेल्या अभ्युदय बँकेवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. तर बँकेचे दैनंदिन संचालन आणि कामकाज सुरळीत पार पडावे याकरिता तीन तज्ज्ञांची सल्लागार कमिटी नियुक्त केली आहे. त्या समितीमध्ये एसबीआयचे माजी महाव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे , सनदी लेखापाल महेंद्र छाजेड आणि श्री कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक.चे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले हे सदस्य असून ते प्रशासकाला मदत करणार आहेत.
अभ्युदय को-ऑप. बँक लिमिटेडची स्थापना जून 1965 मध्ये सहकारातून समृद्धी या ब्रीदवाक्याने करण्यात आली होती. बँकेची वाटचाल वेगाने होत असताना 31 मार्च 2020 पर्यंत बँकेचे 2.23 लाखांहून अधिक सदस्य आणि 17.3 लाखांहून अधिक ठेवीदार आहेत. मार्च 2020 पर्यंत बँकेच्या ठेवी 10 हजार 838 कोटींपर्यंत पोहोचल्या. तर ऍडव्हान्स 6,654 कोटींपर्यंत पोहोचल्या होत्या. बँकेने राखीव ठेवली आहे. ठेवी आणि एकूण ठेवींचे प्रमाण 37.55% इतके आहे.
यापूर्वी 2019 मध्ये आरबीआयने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (पीएमसी बँक) वर निर्बंध लादले होते.
The post RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती appeared first on पुढारी.

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : Abhyudaya Co. Bank : बँकेचा प्रशासकीय व्यवहार योग्य नसल्याचा ठपका ठेवून रिझर्व बँकेने आज अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित करीत 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. मात्र बँकेवर ही कारवाई करताना ग्राहकांवर आर्थिक व्यवहारांसाठी कुठलेही निर्बध लागू केले नसल्याचे ही रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे अभ्युदय बँकेच्या ग्राहकांमध्ये …

The post RBIची कारवाई, अभ्युदय बँकेचे संचालक मंडळ निलंबित; 12 महिन्यांसाठी प्रशासकाची नियुक्ती appeared first on पुढारी.

Go to Source