Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली उत्पादन शुल्क धोरण घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांना पत्र लिहिले आहे. या पत्रात सिसोदिया यांनी सांगितले आहे की, लवकरच ते त्यांच्या समर्थकांना बाहेर भेटणार आहे, असे म्हटले आहे. पुढे त्यांनी आपल्या पत्नीची काळजी घेतल्याबद्दल देखील लोकांचे आभार मानले आहेत. वाचा सिसोदिया यांनी पत्रात काय लिहिले आहे. (Manish Sisodia News)
Manish Sisodia News: शैक्षणिक क्रांती जिंदाबाद
सिसोदिया यांनी समर्थकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “लवकरच बाहेर भेटू, शैक्षणिक क्रांती जिंदाबाद, लव्ह यू ऑल. गेल्या एका वर्षात मी सगळ्यांना मिस केलं. सर्वांनी मिळून मोठ्या प्रामाणिकपणे काम केलं. (Manish Sisodia News)
आम्ही चांगले शिक्षण, शाळांसाठी लढत आहोत
स्वातंत्र्याच्या वेळी जसे सर्वजण लढले, त्याचप्रमाणे आम्ही चांगल्या शिक्षण आणि शाळांसाठी लढत आहोत. इंग्रजांच्या हुकूमशाहीनंतरही स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. त्याचप्रमाणे एक दिवस प्रत्येक मुलाला योग्य आणि चांगले शिक्षण मिळेल. इंग्रजांनाही आपल्या सामर्थ्याचा खूप अभिमान होता. इंग्रज लोकांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकत असत. (Manish Sisodia News)
जेल से शिक्षा क्रांति के जनक मनीष सिसोदिया जी ने अपनी विधानसभा के लोगों के लिए लिखा भावुक संदेश ❤️
इस संदेश को ज़रूर पढ़ें: pic.twitter.com/C6fcagH6ZZ
— AAP (@AamAadmiParty) April 5, 2024
‘हे’ लोक माझे प्ररणास्थान
इंग्रजांनी गांधीजींना अनेक वर्षे तुरुंगात डांबून ठेवले. ब्रिटिशांनी नेल्सन मंडेला यांनाही तुरुंगात टाकले. हे लोक माझे प्रेरणास्थान आहेत आणि तुम्ही सर्व माझी शक्ती आहात. विकसित देश होण्यासाठी चांगले शिक्षण आणि शाळा असणे आवश्यक आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत शैक्षणिक क्रांती झाली याचा मला आनंद आहे. (Manish Sisodia News)
तुरूंगात राहिल्याने सर्वांवरील माझे प्रेम वाढले
पंजाब शैक्षणिक क्रांतीची बातमी वाचून आता समाधान वाटत आहे. तुरुंगात राहिल्याने तुम्हा सर्वांवरील माझे प्रेम आणखी वाढले. तुम्ही लोकांनी माझ्या बायकोची खूप काळजी घेतली. तुमच्या सर्वांबद्दल बोलताना मी भावूक होत आहे. तुम्ही सर्वजण तुमची काळजी घ्या, असे देखील सिसोदिया यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
Lok Sabha Election 2024 : हेडमास्टरना मिळाला लिफाफा, त्यात होते निवडणुकीचे तिकीट
Lok Sabha Election 2024 : परिपूर्ण लोकशाहीसाठी महिलांची भूमिका निर्णायक
Lok Sabha Election 2024 | ‘वंचित’मुळे उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसची कोंडी
Latest Marathi News ‘लव यू ऑल ! लवकरच बाहेर भेटू…’; सिसोदियांचे तुरूंगातून पत्र Brought to You By : Bharat Live News Media.