सर्वात महागडे मशरूम!

क्वोटो : जगभरात जवळपास प्रत्येक ठिकाणी मशरूमला आरोग्यदायी मानले जाते. अनेक आहारतज्ज्ञ देखील याचा आहारात नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला देतात. जगातील सर्वात महागडे मशरूम म्हणून जपानमधील ‘मात्सुतेक’ मशरूमची ख्याती आहे. कोरियन पेनिंसुला आणि चीनमध्ये निर्मिती होणार्‍या या मशरूमची अमेरिकेतही पैदास होते. पण, जपानमधील क्योटो येथे निर्मिले जाणारे मशरूम सर्वाधिक महागडे ठरत आले आहे. या मशरूमचे … The post सर्वात महागडे मशरूम! appeared first on पुढारी.

सर्वात महागडे मशरूम!

क्वोटो : जगभरात जवळपास प्रत्येक ठिकाणी मशरूमला आरोग्यदायी मानले जाते. अनेक आहारतज्ज्ञ देखील याचा आहारात नियमितपणे समावेश करण्याचा सल्ला देतात.
जगातील सर्वात महागडे मशरूम म्हणून जपानमधील ‘मात्सुतेक’ मशरूमची ख्याती आहे. कोरियन पेनिंसुला आणि चीनमध्ये निर्मिती होणार्‍या या मशरूमची अमेरिकेतही पैदास होते. पण, जपानमधील क्योटो येथे निर्मिले जाणारे मशरूम सर्वाधिक महागडे ठरत आले आहे. या मशरूमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा सुवास आणि त्याची चव. एक पौंड वजनाच्या या मशरूमसाठी थोडेथोडके नव्हे, तर तब्बल 41 हजार 708 रुपये मोजावे लागतात. साहजिकच, या मशरूमचा एक किलोचा भाव दीड लाखाच्या घरात जाऊन पोहोचतो.
साहजिकच, एक किलो मशरूमच्या किमतीत आलिशान पार्टी देखील होऊ शकते, असे चित्र आहे. आता ट्रफल मशरूमही महागडे असतात. पण, मात्सुतेक मशरूमची पैदासच कमी होत असल्याने ते अधिक महागडे ठरत आले आहे. दरवर्षी या मशरूमचे 1 हजार टनापेक्षाही कमी पैदास होते. जपानमध्ये सूप किंवा भातासह तसेच काही वेळा फक्त ग्रिल करूनही हे मशरूम सर्व्ह केले जाते.
Latest Marathi News सर्वात महागडे मशरूम! Brought to You By : Bharat Live News Media.