हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार?

मुंबई; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून हार्दिक पंड्या सर्वात जास्त ट्रोल होत आहे. त्याला सर्व ठिकाणी चिडवले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचीही बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता एमआय संघ अ‍ॅक्शन मोडमध्ये आला असून त्यांनी हार्दिक पंड्याला दोन सामन्यांची संधी दिल्याचे समजते आहे. (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलची सुरुवात वाईट … The post हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार? appeared first on पुढारी.

हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार?

मुंबई; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून हार्दिक पंड्या सर्वात जास्त ट्रोल होत आहे. त्याला सर्व ठिकाणी चिडवले जात आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचीही बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता एमआय संघ अ‍ॅक्शन मोडमध्ये आला असून त्यांनी हार्दिक पंड्याला दोन सामन्यांची संधी दिल्याचे समजते आहे. (Hardik Pandya)
मुंबई इंडियन्सची यंदाच्या आयपीएलची सुरुवात वाईट झाली. कारण, मुंबईच्या संघाला पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसर्‍या सामन्यात हैदराबादच्या संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावा केल्या होत्या. या सामन्यातही मुंबईला पराभव पत्करावा लागला. तिसर्‍या सामन्यातही त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला. या तीन पराभवानंतर आता मुंबई इंडियन्सच्या संघाने हार्दिक पंड्याला अल्टिमेटम दिल्याचे समोर आले आहे. (Hardik Pandya)
सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स हा या आयपीएलमधील एकच संघ आहे, जो एकही सामना जिंकू शकलेला नाही. मुंबईचा संघ हा गुणतालिकेत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या संघाने तीन पराभवानंतर आता कडक पाऊल उचलायचे ठरवले आहे. मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्याला अजून दोन सामने कर्णधारपद निभावण्याची मुभा देणार आहे. जर आगामी दोन सामन्यांत हार्दिकला संघासाठी विजय मिळवून देता आला नाही, तर त्याला कर्णधारपदावरून काढले जाऊ शकते. ङ्गया पुढील दोन्ही सामन्यांत मुंबईचा संघ पराभूत झाला तर हार्दिक पंड्याला कर्णधारपदावरून काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. त्याचबरोबर हार्दिकला कर्णधारपदावरून काढले तर कोणाकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आता मुंबईचा संघ पुन्हा रोहित शर्माकडे कर्णधारपदासाठी जाणार का, याची उत्सुकता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना नक्कीच असणार आहे.
हेही वाचा :

गेवराई : शहागड गोदावरी पाञात सापडले पुरातन क्रूड तोफ
सर्वोच्च न्यायालयाची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना समज
ठाणे : येऊर येथील फार्म हाऊसवर दरोडा; २० लाखांचे दागिने लंपास

The post हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदावर टांगती तलवार? appeared first on Bharat Live News Media.