पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : मी आत्तापर्यंत कधीच उमेदवार झालेले नसले तरीही गेली वीस वर्षे राजकीयद़ृष्ट्या सक्रिय होतेच. त्यामुळे राजकीय मंचावर मला नवखेपण जाणवणार नाही. त्यातच मला मतदारसंघाच्या सर्वच भागांतून चांगला प्रतिसाद मिळतो आहे, असे प्रतिपादन बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केले. पवार यांनी दै. ‘Bharat Live News Media’च्या कार्यालयाला गुरुवारी (दि. 4) दिलेल्या भेटीत त्या बोलत होत्या. दै. ‘Bharat Live News Media’चे मुख्य संपादक पद्मश्री प्रतापसिंह जाधव, ‘Bharat Live News Media’ वृत्तसमूहाचे चेअरमन योगेश जाधव यांची सुनेत्रा पवार यांनी लोकसभेच्या उमेदवार म्हणून ‘Bharat Live News Media’च्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत सुनेत्रा पवार यांनी संपादकीय विभागाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या वेळी निवासी संपादक सुनील माळी, सहयोगी संपादक सुहास जगताप, मुख्य बातमीदार ज्ञानेश्वर बिजले, प्रिन्सिपल करस्पॉडंट पांडुरंग सांडभोर, मार्केटिंग हेड संतोष धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीतील अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असून, त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी होत आहे. हा सामना नणंद-भावजय असा होत असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या द़ृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. या लढतीकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रथमच निवडणूक लढवणार्या सुनेत्रा पवार यांनी भेटीगाठींना सुरुवात केली आहे. त्याबाबत विचारता त्या म्हणाल्या की, लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील संपर्काची आपली पहिली फेरी पूर्ण झाली आहे. आपल्याला सर्वच भागांतून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. इंदापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या, तसेच माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत उद्या, शुक्रवारी मेळावा होणार आहे. मतदारसंघात पहिल्या काही दिवसांत असलेले वातावरण आता एकदम बदलले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बारामतीकरांचे विशेष प्रेम मिळत आहे. सर्व बारामतीकर उत्साहाने बाहेर पडून साथ देत आहेत. अगोदर बारामतीकर बाहेर पडत नव्हते. मात्र, त्यांच्यामध्ये आता स्पष्टता आल्याने बाहेर पडू लागले आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह जाणवत आहे. नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. गारटकर म्हणाले की, सर्व सहाही विधानसभा मतदारसंघांत आम्ही आघाडी घेऊ. सर्व ठिकाणी कार्यकर्ते काम करत आहेत. विकासकामे मोठ्या प्रमाणावर केल्याने त्याचा फायदा होईल. खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांची संख्या मोठी असून, या शहरी भागात भाजपचे कार्यकर्तेही जोरदार प्रचार करत आहेत.
हेही वाचा
धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट
जीएसटी वाढीत सांगलीचा टक्का राज्यापेक्षा कमी
Ratnagiri news : ‘लेक लाडकी’ करणार ‘लखपती’
Latest Marathi News राजकारणात नवखेपणा नाही; ‘Bharat Live News Media‘ कार्यालयाच्या सदिच्छा भेटी दरम्यान सुनेत्रा पवारांची स्पष्टोक्ती Brought to You By : Bharat Live News Media.