भाजप वगळता सर्वच पक्षांना सोडाव्या लागल्या हक्काच्या जागा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जागावाटपाच्या वाटाघाटीत महाविकास असो की महायुती, या दोन्ही आघाड्यांमध्ये भाजप वगळता सर्वच पक्षांना आपल्या काही जागांबाबत त्याग करावा लागला आहे. भाजपने 2019 मध्ये 25 जागा लढल्या, त्या सर्वच जागांवर आपली दावेदारी टिकवून ठेवली आहे. या जागांपैकी बहुसंख्य जागांवर आपले उमेदवारही त्यांनी निश्चित केले आहेत. मात्र इतर सर्व पक्षांना आपापल्या मित्र पक्षांसाठी … The post भाजप वगळता सर्वच पक्षांना सोडाव्या लागल्या हक्काच्या जागा appeared first on पुढारी.

भाजप वगळता सर्वच पक्षांना सोडाव्या लागल्या हक्काच्या जागा

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : जागावाटपाच्या वाटाघाटीत महाविकास असो की महायुती, या दोन्ही आघाड्यांमध्ये भाजप वगळता सर्वच पक्षांना आपल्या काही जागांबाबत त्याग करावा लागला आहे. भाजपने 2019 मध्ये 25 जागा लढल्या, त्या सर्वच जागांवर आपली दावेदारी टिकवून ठेवली आहे. या जागांपैकी बहुसंख्य जागांवर आपले उमेदवारही त्यांनी निश्चित केले आहेत. मात्र इतर सर्व पक्षांना आपापल्या मित्र पक्षांसाठी जागांचा त्याग करावा लागला आहे.
भाजपने गेल्यावेळेस केवळ दोन पक्ष असलेल्या युतीत 25 जागा लढून 23 जिंकल्या होत्या. या वेळेस युतीत आणखी एक मोठा पक्ष सामील होऊन युतीची महायुती झाल्यावरही त्यांनी 21 जागा मिळवून उमेदवार जाहीर केले आहेत. आणखी काही जागा त्यांना मिळतील, असे चित्र असल्याने जवळपास गेल्या वेळेइतक्याच जागांवर भाजप लढेल, हे स्पष्ट आहे.
महाविकास आघाडीतील त्यागचित्र
महाविकास आघाडीत काँग्रेसने भिवंडी, सांगली, वर्धा, जालना, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर आपली दावेदारी सोडली आहे. भिवंडीची जागा राष्ट्रवादी, सांगलीची शिवसेनेला सोडण्याची पाळी काँग्रेसवर आली आहे. विदर्भात महात्मा गांधींची कर्मभूमी असलेल्या वर्धेची जागा राष्ट्रवादीने हट्टाने मागून घेतली. राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार नसतानाही वर्धा जागा काँग्रेसकडून मिळवतानाच काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना वर्धेत उमेदवारीही देण्यात आली आहे. 2019 मध्ये काँग्रेसने 25 जागा लढल्या आणि केवळ एक जागेवर विजय मिळविला. जागा वाटपाच्या वाटाघाटीत काँग्रेस एक जागा असूनही 16 ते 18 जागा मिळवू शकेल, असे चित्र आहे. याउलट महायुतीत एकच खासदार सोबत असलेले अजित पवार पाच-सहा जागांच्यावर जागा मिळवू शकलेले नाहीत.
शिवसेना(शिंदे) गटासोबत 13 खासदार गेले होते. जवळपास 12-13 जागा मिळविण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे, असे चित्र आहे. मात्र गेल्यावेळेस अविभाजित शिवसेनेने 23 जागा लढून 18 जागा जिंकल्या होत्या. 2019 ला लढलेल्या जागांची तुलना करता शिंदे गेल्यावेळेस भाजपसोबत युतीत लढलेल्या अनेक जागाही मिळवू शकलेले नाहीत. सध्या शिंदे गटाने 9 उमेदवार जाहीर केले आहेत. या व्यतिरिक्त त्यांना आणखी 3 ते 4 मतदारसंघ सुटतील. महायुतीत शिवसेनेने आपली अमरावतीची जागा भाजपला तर परभणीची जागा राष्ट्रवादीला सोडली आहे.
सध्या जवळपास अंतिम टप्प्यात असलेल्या सहमतीनुसार शिवसेना पालघरचा मतदारसंघ भाजपला तर नाशिकचा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडणार आहे. खरेतर राष्ट्रवादी आपला सातारा मतदारसंघ भाजपसाठी सोडत असताना भाजपने त्यांच्यासाठी एखादा मतदारसंघ सोडण्याऐवजी शिवसेनेला आपल्यासाठी नाशिकचा त्याग करायला सांगितले आहे. एवढेच नव्हे तर धाराशिवमध्ये उमेदवार तगडा नसल्याचे कारण देत हा मतदारसंघ शिवसेनेला राष्ट्रवादीला सोडावा लागला. राष्ट्रवाीदकडेही स्वतःचा उमेदवार नसल्याने त्यांना भाजपचे आमदार राणा जगजित सिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना पक्षात आणून उमेदवारी द्यावी लागली. अर्चना पाटील यांना शिंदे शिवसेनेनेच आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी का दिली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे भाजप आमदाराच्या पत्नीला तिकिट द्यायला लावून भाजपनेच ही जागा अप्रत्यक्षपणे आपल्या पदरात पाडून घेतल्याचे चित्र आहे.
अविभाजित राष्ट्रवादीने गेल्यावेळेस 19 जागा लढून 4 जागा जिंकल्या होत्या. मात्र पक्ष फुटीनंतर केवळ एकच खासदार अजित पवार यांच्यासोबत गेला. त्यामुळे जागा वाटपाच्या वाटाघाटीत राष्ट्रवादी(अजित पवार) गटाला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागेल असे चित्र आहे.
Latest Marathi News भाजप वगळता सर्वच पक्षांना सोडाव्या लागल्या हक्काच्या जागा Brought to You By : Bharat Live News Media.