धुळे: तरुणाच्या खूनप्रकरणी टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई

धुळे, पुढारी वृत्तसेवा : तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यास नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या आरोपींना आता मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आले असल्याची माहिती आज (दि.२४) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी … The post धुळे: तरुणाच्या खूनप्रकरणी टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई appeared first on पुढारी.
#image_title

धुळे: तरुणाच्या खूनप्रकरणी टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई

धुळे, पुढारी वृत्तसेवा : तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यास नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या आरोपींना आता मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आले असल्याची माहिती आज (दि.२४) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. Dhule News
धुळे येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाई संदर्भात माहिती दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची उपस्थिती होती. Dhule News
धुळे शहरात गांधी पुतळ्याजवळ महेश पवार उर्फ लाल डोळा, अक्षय साळवे, गणेश माळी, एक अल्पवयीन मुलगा तसेच जगदीश चौधरी, नासिक येथील शरद , गणेश पाटील, जिभ्या यांनी शुभम साळुंखे या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर याला तेथून उचलून नेऊन डम्पिंग ग्राउंड परिसरात त्याच्यावर हल्ला चढवला. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात शुभम साळुंखे याला मारण्यासाठी विनोद रमेश थोरात तसेच हर्षल रघुनाथ चौधरी यांनी आरोपींना सुपारी देऊन चिथावणी दिल्याची बाब देखील स्पष्ट झाली.
या सर्व दहा जणांविरोधात हत्यार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सुरू केला. यात या आरोपींनी गेल्या दहा वर्षात संघटित गुन्हेगारी करून तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षेस पात्र असलेली गुन्ह्याची बाब निदर्शनास आणली. याची न्यायालयाने देखील दखल घेतली. या सर्व आरोपींना विरोधात 26 गुन्हे दाखल असल्याची बाब देखील उघडकीस आली असून यातील दोन गुन्ह्यांमध्ये शिक्षा देखील झाल्याची बाब उघडकीस आली. प्रचलित कायद्यानुसार प्रतिबंधित केलेले बेकायदेशीर कृत्य आरोपींच्या टोळीने स्वतःचे व टोळीच्या सदस्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केल्याची बाब उघड झाली. त्यामुळे समाजविघातक संघटना किंवा टोळी यांच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष तरतुदी करण्याकरता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अन्वये कारवाई करण्याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी आदेशित केले आहे.
तपास अधिकारी दत्तात्रय शिंदे यांनी पोलीस महानिरीक्षक यांच्या पूर्वपरवानगीसाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार त्यांनी मोक्का कायद्याअंतर्गत वाढीव कलम लावण्यास परवानगी दिल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. त्यामुळे आता पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
हेही वाचा 

धुळे: शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक गजाआड
धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता
धुळे : ज्ञान देणारे नसतील तर ऐश्वर्य आणि वैभव निरुपयोगी : पंडित प्रदीप मिश्रा

The post धुळे: तरुणाच्या खूनप्रकरणी टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई appeared first on पुढारी.

धुळे, पुढारी वृत्तसेवा : तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करण्यास नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. बीजी शेखर पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे या आरोपींना आता मोक्काचे वाढीव कलम लावण्यात आले असल्याची माहिती आज (दि.२४) पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी …

The post धुळे: तरुणाच्या खूनप्रकरणी टोळीविरोधात मोका अंतर्गत कारवाई appeared first on पुढारी.

Go to Source