सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

बदलणार्‍या डिजिटल युगात निवडणूक प्रचाराच्या काही पारंपरिक पद्धती काही प्रमाणात कमी झाल्या असून, त्याची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला मात्र दक्ष रहावे लागणार आहे. कारण, सोशल मीडियावरून केला जाणारा प्रचार व त्याचा खर्च यावर देखरेख करणे हे मोठेच आव्हान ठरणार आहे. याला सामोरे जाण्यासाठी आयोग यावेळी मोठ्या प्रमाणावर काम करत … The post सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर appeared first on पुढारी.

सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर

बदलणार्‍या डिजिटल युगात निवडणूक प्रचाराच्या काही पारंपरिक पद्धती काही प्रमाणात कमी झाल्या असून, त्याची जागा आता सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला मात्र दक्ष रहावे लागणार आहे. कारण, सोशल मीडियावरून केला जाणारा प्रचार व त्याचा खर्च यावर देखरेख करणे हे मोठेच आव्हान ठरणार आहे. याला सामोरे जाण्यासाठी आयोग यावेळी मोठ्या प्रमाणावर काम करत आहे.
एक काळ असा होता की निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले निवडणूक चिन्ह असलेले झेंडे घेऊन रस्त्यांवर, गल्लोगल्ली कार, रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये लाऊडस्पीकर लावून प्रचार करायचे. आता प्रत्येक पक्ष आणि उमेदवारही आपापल्या स्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर स्वत:चा, पक्षांकडून आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसतो. राजकीय पक्ष आणि उमेदवार सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सोशल मीडियावर लोकांना समजेल अशा भाषेत प्रचाराचा मजकूर तयार केला जातो. यासाठी इन्स्टाग्राम, यूट्यूब, एक्स, व्हॉट्स अ‍ॅप, प्रचारासाठी तयार केले जाणारे विशेष अ‍ॅप, टीव्ही, स्नॅपचॅट, एआयद्वारे प्रचार, ईमेल, वेबसाईट, टीव्ही जाहिराती, मालिकांमधून प्रचार किंवा एखाद्या कार्यक्रमात दिल्या जाणार्‍या जाहिरातींशिवाय अनेक सोशल मीडिया माध्यमांद्वारे प्रचार केला जातो.
प्रचारासाठी परवानगी आवश्यक
राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने सोशल मीडियाच्या कोणत्याही माध्यमातून निवडणुकीचा प्रचार केला, तर त्याआधी आपल्या भागातील संबंधित निवडणूक अधिकार्‍याची त्यासाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक अधिकार्‍याने त्याला मान्यता दिल्यास राजकीय पक्ष किंवा उमेदवार सोशल मीडियावर निवडणूक प्रचार करू शकतात.
निवडणूक आयोगाने सोशल मीडियासह निवडणुकीदरम्यान आचारसंहितेच्या उल्लंघनावर नजर ठेवण्यासाठी देशातील अनेक जिल्हे आणि राज्य स्तरावर कंट्रोल रूम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सोशल मीडियासह सर्व निवडणूक प्रचार आणि आचारसंहिता उल्लंघनावर प्रत्येक जिल्हा आणि राज्य स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या मॉनिटरिंग सेल अर्थात नियंत्रण कक्षाद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. हे नियंत्रण कक्ष राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली कार्यरत असणार आहेत. या नियंत्रण कक्षात बसलेली आयोगाची आयटी टीम राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून सोशल मीडियावर चालवलेल्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवून आहे.
Latest Marathi News सोशल मीडियावरील प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर Brought to You By : Bharat Live News Media.