कर्ज गैरव्यवहार प्रकरण : ससून रुग्णालय झाले न्यायालय!
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील दोन आरोपींची गुरुवारी (दि. 4) ससून रुग्णालयात सुनावणी झाली. रोझरी स्कूलचा संचालक विनय अर्हाना आणि अॅड. सागर सूर्यवंशी या दोघांची पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी (दि.4) संपली. मात्र, अॅड. सूर्यवंशी याला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केल्याने आरोपीला पाहण्यासाठी एमपीआयडीचे कोर्टच रुग्णालयात गेले. पुण्यात कोर्ट आरोपीसाठी ससून रुग्णालयात जाण्याची ही कदाचित दुर्मीळ घटना आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाला न्यायालयाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांना कोर्टासमोर हजर करणे आवश्यक होते. परंतु, त्यातील अॅड. सूर्यवंशी या आरोपीला ससून रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर एमपीआयडी कोर्टचे न्यायाधीश के. पी. नांदेडकर, सरकारी वकील मारुती वाडेकर, कर्मचारी व स्टेनो त्याला उपचारासाठी दाखल केलेल्या वॉर्ड नं. 15 मध्ये गेले.
आरोपीचे म्हणणे होते की, त्याच्या छातीत चमक भरत आहे आणि पाठीमध्ये दुखत आहे. न्यायाधीशांनी डॉक्टरांना आरोपीला तपासायला सांगितले. त्याची तब्येत कशी आहे ते न्यायाधीशांना जाणून घ्यायचे होते. डॉक्टरांनी सांगितले तब्येत चांगली आहे. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास झाला आहे. हे पाहून न्यायाधीशांनी आरोपी सूर्यवंशी उपचाराच्या कारणास्तव न्यायालयीन कोठडी, तर विनय अर्हाना याला 6 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
हेही वाचा
Ratnagiri news : ‘लेक लाडकी’ करणार ‘लखपती’
माथ्यावर तळपे ऊन!
गेवराई : शहागड गोदावरी पाञात सापडले पुरातन क्रूड तोफ
Latest Marathi News कर्ज गैरव्यवहार प्रकरण : ससून रुग्णालय झाले न्यायालय! Brought to You By : Bharat Live News Media.