छ. संभाजीनगर: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन बिल्डरकडून ११ लाख उकळले, तरुणीला अटक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर ओळख करून प्रत्यक्ष भेट घ्यायची.. बडी आसामी असल्याची खात्री पटल्यावर थेट मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचा.. त्यातून जवळीक साधायची.. हळूच लगट करायची अन् त्या खास क्षणांचे फोटो, चित्रीकरण करून ब्लॅकमेल करीत पैसे उकळायचे आणि नकार आलाच तर बदनामीच्या धमक्या द्यायच्या. अशाच पद्धतीने एका बिल्डरकडून ५ लाख रुपये उकळले. त्यानंतर पुन्हा … The post छ. संभाजीनगर: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन बिल्डरकडून ११ लाख उकळले, तरुणीला अटक appeared first on पुढारी.
#image_title

छ. संभाजीनगर: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन बिल्डरकडून ११ लाख उकळले, तरुणीला अटक

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर ओळख करून प्रत्यक्ष भेट घ्यायची.. बडी आसामी असल्याची खात्री पटल्यावर थेट मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचा.. त्यातून जवळीक साधायची.. हळूच लगट करायची अन् त्या खास क्षणांचे फोटो, चित्रीकरण करून ब्लॅकमेल करीत पैसे उकळायचे आणि नकार आलाच तर बदनामीच्या धमक्या द्यायच्या. अशाच पद्धतीने एका बिल्डरकडून ५ लाख रुपये उकळले. त्यानंतर पुन्हा ११ लाखांच्या खंडणी घेणाऱ्या टोळीचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी पर्दाफाश केला. यात तरुणीला गजाआड केले. २३ नोव्हेंबरला मॉस्को कॉर्नर, चिकलठाणा एमआयडीसीत ही कारवाई करण्यात आली. Chh. Sambhajinagar News
स्वाती विश्वकांत केंद्रे (वय २८) आणि ताहेर पठाण, अशी आरोपींची नावे आहेत. यातील स्वाती केंद्रे हिला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, अमर (काल्पनिक नाव) हा बांधकाम व्यावसायिक आहे. मे २०२३ मध्ये सोशल मीडियावरील टिंडर अॅपच्या माध्यमातून त्यांची स्वाती केंद्रे नावाच्या तरुणीशी ओळख झाली. अॅपवरून त्यांच्यात चॅटिंग सुरु झाली. दोन दिवसांतच तिने भेटण्याचा प्रस्ताव ठेवला. अमरही लगेच तिला भेटायला गेला. एकमेकांचा परिचय झाला. तेव्हा स्वातीने तिचे नाव सायली, असे सांगितले होते. तसेच, लग्न झालेले असून पती कामानिमित्त बाहेर असतो. त्यामुळे चांगला मित्र हवा, असे सांगून तिने थेट लाँग लाईफ मैत्रीचा पस्ताव ठेवला. तेव्हा अमरनेही संसारिक असल्याचे सांगून पत्नी, मुले असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारू शकत नाही, हेही तो म्हणाला होता. तेव्हा तिने पटकन स्वत:ला सावरून मैत्रीचा हात पुढे केला. पुढे त्यांची ओळख वाढत गेली. ओळखीचे चांगल्या मैत्रीत रुपांतर झाले. ते अनेकदा भेटले. तेव्हा आरोपींनी त्या काही खास क्षणांचे फोटो काढून ठेवले. Chh. Sambhajinagar News
कौटुंबिक कारणे सांगत उकळले पैसे
अमर आणि स्वातीची मैत्री हळूहळू पुढच्या टप्प्यावर गेली. तेव्हा तिने कौटुंबिक कारणे सांगून अमरकडून कधी १० तर कधी २० हजार करुन अनेकदा पैसे उकळले. जवळपास ४० ते ५० हजार रुपये उकळले. हे पैसे तिने परत केले नाहीत.
Chh. Sambhajinagar News  : ताहेरलाच बनविले संतोष मुंढे
नोव्हेंबर २०२३ च्या आधी स्वातीने अमरला फोन केला. आपल्या मैत्रीबाबत पती संतोष मुंढे याला माहिती झाल्याचा बनाव केला. तसेच, त्याने वाद घातला असून त्याने मला व्यवसायासाठी ५ लाख रुपये दिले होते, ते परत मागत असल्याचे सांगून तत्काळ ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच, पैसे दिले नाही तर तुझ्या घरी येऊन सर्वांना याबाबत सांगावे लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर ७ नोव्हेंबरला ती तिच्या स्कूटीवरून (एमएच २०, एफक्यू ०६६२) कलाग्रामजवळ आली. एक काळ्या रंगाची चारचाकी काही अंतरावर उभी करून त्यात पती संतोष मुंढे असल्याचे सांगितले. त्याच्याशी अमरचे बोलणे करून दिले. त्यानेही पैशांची मागणी केली. तेव्हा तीन लाख रुपये रोख, ७५ हजार फोन पे वर आणि २५ हजार रुपये बँक खात्यावर पाठविले होते.
लग्न कर नाहीतर व्हिडिओ व्हायरल करेल
८ नोव्हेंबरला चार लाख रुपये दिल्यानंतर १५ नोव्हेंबरला स्वाती केंद्रे हिने टाऊन सेंटर येथील अमरचे कार्यालय गाठले. त्याला व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून व्हायरल करण्याची धमकी देत लग्न करण्यासाठी दबाव टाकला. तेव्हा हो नाही करीत तिने त्याला ११ लाखांची खंडणी मागितली.
अशी केली कारवाई
ही ब्लॅकमेलिंग कुठे तरी थांबली पाहिजे, असा विचार करून अमरने एमआयडीसी सिडको ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना सर्व हकिकत सांगितली. त्यांनी उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अंमलदार कोमल तारे, गायकवाड यांना कारवाईसाठी सोबत घेतले. ५०० च्या ४८ नोटा खाली वर लावून मध्ये मनोरंजनाच्या नोटा घातल्या आणि १२ बंडल तयार केले. मॉस्को कॉर्नर येथे सापळा लावला. स्वाती केंद्रे ही फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घालून आल्याची खात्री पटताच तिला पोलिसांनी पैसे घेताना रंगेहात पकडले. तिच्यावर एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास अमोल सोनवणे करीत आहेत.
हेही वाचा 

छ. संभाजीनगर : पोलीस बंदोबस्तात नाथसागर धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू
छ. संभाजीनगर : पैठण येथे छगन भुजबळ यांच्या निषेधार्थ रास्ता रोको
छ. संभाजीनगर : पैठण येथे नाथसागर धरणात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको

The post छ. संभाजीनगर: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन बिल्डरकडून ११ लाख उकळले, तरुणीला अटक appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावर ओळख करून प्रत्यक्ष भेट घ्यायची.. बडी आसामी असल्याची खात्री पटल्यावर थेट मैत्रीचा प्रस्ताव ठेवायचा.. त्यातून जवळीक साधायची.. हळूच लगट करायची अन् त्या खास क्षणांचे फोटो, चित्रीकरण करून ब्लॅकमेल करीत पैसे उकळायचे आणि नकार आलाच तर बदनामीच्या धमक्या द्यायच्या. अशाच पद्धतीने एका बिल्डरकडून ५ लाख रुपये उकळले. त्यानंतर पुन्हा …

The post छ. संभाजीनगर: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन बिल्डरकडून ११ लाख उकळले, तरुणीला अटक appeared first on पुढारी.

Go to Source