हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे धक्के; ५.३ रिश्टर स्केल इतकी तीव्रता
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशातील चंबा येथे गुरुवारी (दि. ४) रात्री भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रात्री ९.३४ वाजता हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 एवढी होती, जी जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होती. त्याचा केंद्रबिंदू चंबा असल्याचे सांगितले जाते. सध्या भूकंपाबद्दल अधिक माहिती गोळा केली जात आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले, असे सांगण्यात येत आहे.
An earthquake of magnitude 5.3 on the Richter Scale hit Chamba, Himachal Pradesh, at 21:34 pm today: National Center for Seismology pic.twitter.com/DuHDZGSftq
— ANI (@ANI) April 4, 2024
#WATCH | An earthquake of magnitude 5.3 on the Richter Scale hit Chamba, Himachal Pradesh, at 21:34 pm today. pic.twitter.com/xTnWn5Y1sz
— ANI (@ANI) April 4, 2024
Latest Marathi News हिमाचल प्रदेशातील चंबा येथे भूकंपाचे धक्के; ५.३ रिश्टर स्केल इतकी तीव्रता Brought to You By : Bharat Live News Media.