भाजपला धक्का! विकास ठाकरेंच्या समर्थनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ मैदानात
नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : भाजपच्या बालेकिल्ल्यात 12 वर्ष आमदार राहिलेल्या भाजप समर्थित नागो गाणारांना पराभूत करणारे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे काँग्रेस,मविआ,इंडिया आघाडीचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विकास ठाकरे यांना सक्रीय पाठिंबा जाहीर केला आहे.
देशातील हुकुमशाही सरकारचा बीमोड , संविधान रक्षण,तरुणांना रोजगार, शिक्षण-शिक्षकांच्या हितासाठी आपण हा पाठिंबा विदर्भातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना जाहीर केला असल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी एका पत्राद्वारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरेंना कळविले आहे.
विकास ठाकरे यांना यापूर्वी वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), रिपब्लिकन संयुक्त आघाडी यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी त्यांची थेट लढत नागपुरात होत आहे.
Latest Marathi News भाजपला धक्का! विकास ठाकरेंच्या समर्थनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ मैदानात Brought to You By : Bharat Live News Media.