Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : गुजरातविरूद्धच्या अतितटीच्या सामन्यात पंजाब किंग्जने तीन विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. गुजरातने दिलेल्या 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी तुफानी फलंदाजी करत हे आव्हान पार केले. (PBKS vs GT)
गुजरातने दिलेल्या आव्हानचा पाठलाग करताना शशांक सिंगने 29 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची नाबाद खेळी करत पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर विजय मिळवून दिला. आयपीएलच्या चालू मोसमातील चार सामन्यांमधला पंजाबचा हा दुसरा विजय आहे. पंजाबला यापूर्वी दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र संघाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुजरातचा घरच्या मैदानावर पराभव केला.
गुजरातने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलच्या 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 89 धावांच्या जोरावर चार गडी गमावून 199 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. पण इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या शशांक आणि आशुतोष शर्माने संघाला सामन्यात परत आणले. या दोन फलंदाजांच्या जोरावर पंजाबने एक चेंडू राखून विजयाची नोंद केली. गुजरातकडून गोलंदाजीमध्ये नुर अहमदने दोन तर, उमरझाई, उमेश यादव, राशिद खान, मोहित शर्मा आणि दर्शन नळकांडे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जसमोर विजयासाठी 200 धावांचे लक्ष्य ठेवले. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची खेळी केली. गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. गिल या मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. पंजाबकडून वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने चार षटकांत ४४ धावांत दोन बळी घेतले, तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
Match 17. Punjab Kings Won by 3 Wicket(s) https://t.co/0Sy2civWDI #TATAIPL #IPL2024 #GTvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
हेही वाचा :
Lok Sabha Election 2024 : संजय शिरसाट शिंदेसेनेचे सक्षम उमेदवार ठरतील : संजय केनेकर
..तर निवडणुकांचे पर्व संपून जाईल : नाना पटोले
कोल्हापूर : रंकाळा तलावाजवळ तरुणाचा पाठलाग करून निर्घृण खून; हल्लेखोर पसार
Latest Marathi News गुजरातविरूद्ध पंजाबच ‘किंग’ Brought to You By : Bharat Live News Media.